मुंबई

बामणडोंगरी स्थानकाच्या दोन्ही बाजूंना बेशिस्त पार्किंगचा विळखा!

CD

बामणडोंगरीत बेशिस्त पार्किंगचा विळखा
अरुंद रस्त्यांमुळे पादचारी, वाहनचालकांची कोंडी

उलवे, ता. २७ (बातमीदार) : बामणडोंगरी रेल्वे स्थानक परिसरात बेशिस्त पार्किंगची समस्या गंभीर बनली असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः उन्नती सोसायटीबाहेरील रस्त्यावर कार, अवजड वाहने आणि इतर वाहने उभी केली जात असल्याने रस्त्यावरील वाहतुकीची जागा कमी झाली आहे. परिणामी, पादचारी आणि वाहनचालकांना वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागत असून, अपघाताचा धोकाही वाढला आहे.

बामणडोंगरी रेल्वे स्थानक परिसरात दररोज प्रवाशांची मोठी वर्दळ असते. नोकरी-व्यवसायानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांसह स्थानिक रहिवाशांचीही या रस्त्यावरून सतत वाहतूक सुरू असते, मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी राहत असल्याने मार्ग अरुंद झाला आहे. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने त्यांना थेट वाहनांच्या मार्गावरून चालावे लागते.

स्थानक परिसरातील रस्ते प्रवाशांच्या सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी मोकळे असणे आवश्यक आहे, मात्र बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या परिसराची पाहणी करून नियमबाह्य पार्किंगवर कारवाई करावी आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने हटवावीत, अशी मागणी होत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.


‘रस्ता नागरिकांसाठी की पार्किंगसाठी?’
बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत उलवे येथील रहिवासी बाबाजी कोकाटे म्हणाले, “बेशिस्त पार्किंगमुळे रस्ता नागरिकांसाठी आहे की वाहनांच्या पार्किंगसाठी, असा प्रश्न पडतो. रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने पादचाऱ्यांसाठी स्वतंत्रपणे चालण्याची जागा शिल्लक राहत नाही. यातून अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा.”

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT