मुंबई

भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात संतापाचा उद्रेक!

CD

कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : कर्जत, भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीविरोधात कल्याण पूर्वेत नागरिकांचा संताप उफाळून आला. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी एकत्र येत कोळसेवाडी रिक्षा स्टँड येथे सोमवारी (ता. २६) संध्याकाळी सह्यांची मोहीम राबवली. अवघ्या दोन तासांत १,५५० नागरिकांनी सह्या करून वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला. विकासाच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीचा जाब सरकारला विचारणार, असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

सहयोग संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी सरकारच्या वृक्षारोपणाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारकडून ९० हजार झाडे लावण्याचे सांगितले जात असले, तरी समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी तोडण्यात आलेल्या लाखो झाडांच्या बदल्यात किती झाडे लावली आणि ती सध्या कुठे आहेत, याचा हिशेब सरकारने द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. ग्रीन बेल्ट विकसित करण्याच्या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे का, याचीही तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

गोवा महामार्ग तसेच पुणे आणि तुळजापूर महामार्गांच्या कामांदरम्यान किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात किती झाडे लावली, याबाबत पारदर्शक माहिती समोर आणण्याची मागणीही भोसले यांनी केली. केवळ वृक्षारोपणाचे आकडे जाहीर करून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी पूर्ण होत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘पुढचे आंदोलन भीमाशंकरमध्ये’
स्टडी वेव्हज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी यांनी सरकारला आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. वृक्षतोडीचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही, तर पुढील आंदोलन थेट भीमाशंकर येथे करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आम आदमी पार्टीचे धनंजय जोगदंड यांनीही वृक्षतोडीच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. जंगल तोडून होणारा विकास हा विकास नसून भकासपणा आहे, अशी टीका करत याप्रकरणी सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT