मुंबई

‘जोशी कट्ट्या’ला व्यायामशाळेची जोड

CD

ठाणे, ता. २७ (बातमीदार) : जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे क्षण अनुभवण्यासाठी आणि हरवलेल्या बालपणाचा आनंद पुन्हा मिळवण्यासाठी पारसिक, कळवा येथे सुरू करण्यात आलेल्या ‘जोशी कट्ट्या’ला आता खुल्या व्यायामशाळेची जोड मिळाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासोबतच आरोग्याची काळजी घेता यावी, या उद्देशाने उभारलेल्या या व्यायामशाळेमुळे परिसरातील ज्येष्ठांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

कवी बाळ कांदळकर यांच्या पुढाकारातून ‘जोशी कट्ट्या’ची स्थापना करण्यात आली. या कट्ट्यासाठी आता अधिकृत जागा उपलब्ध झाली असून, तेथे खुली व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. नगरसेविका विजया लासे यांनी प्रभाग सुधारणा निधीतून व्यायामशाळेची उभारणी केली. या व्यायामशाळेचे उद्‍घाटन विजया आणि मनोज लासे यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आनंद जपण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे ज्येष्ठांना एकत्र येण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी आणि आपुलकीच्या वातावरणात वेळ घालवण्यासाठी एक हक्काचे ठिकाण मिळाले आहे.

ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांच्या मनात फुलणारा आनंद, हेच ‘जोशी कट्ट्या’चे खरे यश आहे. ज्येष्ठांना आपुलकीचे हक्काचे ठिकाण मिळाले, यापेक्षा मोठे समाधान नाही, अशी भावना कांदळकर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT