मुंबई

घराची वीजजोडणी तोडल्याने संताप

CD

कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : घर अनधिकृत असल्याचे कारण देत कल्याण-डोंबिवली पालिकेने कल्याण लाइक कुरेशी यांच्या घराची वीजजोडणी तोडल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यामुळे कुरेशी कुटुंब गेल्या आठ दिवसांपासून अंधारात आहे. या कारवाईवरून नगरसेविका तथा काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी सोमवारी (ता. २६) पत्रकार परिषद घेऊन महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. वीजमीटर काढण्याचा अधिकार महावितरणचा असताना पालिकेने कोणत्या कायदेशीर अधिकारात वीजपुरवठा खंडित केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, कल्याण पश्चिमेतील संत रोहिदासवाडा परिसरात लाइक कुरेशी हे गेल्या ४० वर्षांपासून कुटुंबासह याच घरात राहतात. चार दशके वास्तव्य असताना आता अचानक घर अनधिकृत ठरवून कारवाई का करण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सहाय्यक आयुक्तांकडून कारवाईचे समर्थन
कुलकर्णी यांनी पालिकेचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्याशी फोनवर संपर्क साधून कारवाईचा आधार विचारला. अनधिकृत घर खाली करण्यासाठी पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्याची तरतूद असल्याचे थोरात यांनी सांगितले. तसेच रेणुका कांबळे यांच्या तक्रारीनुसार संबंधित अनधिकृत बांधकामावरील कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT