मुंबई

फार्मर आयडीसाठी शेतकऱ्यांना आवाहन

CD

फार्मर आयडीसाठी शेतकऱ्यांना आवाहन

नोंदणीअभावी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता

जव्हार, ता. २७ (बातमीदार) : जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय कृषी योजनांचा लाभ मिळविण्यात फार्मर आयडी महत्त्वाचा ठरणार आहे. या ओळखपत्राअभावी विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
फार्मर आयडी तयार करण्यासाठी शेतजमिनीची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती एकाच प्रणालीशी जोडली जाते. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची पडताळणी करणे अधिक सुलभ होते. तसेच चुकीच्या किंवा अपूर्ण नोंदींमुळे उद्भवणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होते. शासकीय कृषी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) नोंदणी महत्त्वाची ठरणार आहे. नोंदणीअभावी शेतकऱ्यांना विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.

फार्मर आयडीद्वारे शेतजमीन, बँक खाते आणि शेतकऱ्यांची माहिती एकाच प्रणालीशी जोडली जाणार आहे. यामुळे लाभार्थ्यांची पडताळणी सुलभ होऊन अनुदान वितरणात पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. विशेषतः दुष्काळी परिस्थितीत पात्र शेतकऱ्यांपर्यंत शासकीय मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने या नोंदणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा कृषी सेवा केंद्रात संपर्क साधावा. तसेच संबंधित कृषी सहाय्यकांचे मार्गदर्शन घेऊन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन कृषी अधिकारी जयराम अढळ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांसंदर्भात आयोगाचं मोठं पाऊल; पाचही राज्यांच्या मुख्य सचिवांना महत्त्वाचे निर्देश

Land Rover Defender: 'डिफेंडर' प्रेमींसाठी गुड न्यूज! गाडीची किंमत तब्बल ३४ लाखांनी कमी कशी झाली?

Scholarship Exam : इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २१ फेब्रुवारीला होणार

Latest Marathi News Live Update : अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक; महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक 1694 मतांनी आघाडीवर

IND vs NZ T20: यांना रोखणं अवघड... किवी कर्णधाराची बोलती बंद; श्रेयस अय्यर म्हणाला, अभिषेक-वैभवने हे कसे केले याचे मला आश्चर्य

SCROLL FOR NEXT