मुंबई

तुर्भे स्टोअरमधील अपघातानंतर महापालिका खडबडून जागी

CD

तुर्भे स्टोअरमधील अपघातानंतर महापालिका खडबडून जागी
छाया गायकवाड यांच्या मृत्यूनंतर नागरिकांच्या लढ्याला यश; महिनाभरात पादचारी पूल उभारण्याचे लेखी आश्वासन
तुर्भे, ता. २७ (बातमीदार) : तुर्भे स्टोअर येथील ठाणे-बेलापूर मार्गावर रस्ता ओलांडताना छाया गायकवाड या महिलेचा अपघात होऊन मृत्यू झाल्यानंतर अखेर नवी मुंबई पालिका प्रशासनाला जाग आली आहे. या अपघाताची गंभीर दखल घेत महापालिकेने पुढील एका महिन्यात पादचारी पूल उभारण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सुरक्षित पादचारी मार्गाची मागणी करणाऱ्या नागरिकांच्या लढ्याला अखेर यश आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते अभिमान जगताप यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी या धोकादायक ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. या निवेदनाची दखल घेत महापालिकेचे कार्यकारी अभियंता पंढरीनाथ चवडे यांनी महिनाभरात पादचारी पूल उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने पादचारी पूल उभारण्याबरोबरच वाहतूक पोलिस आणि सुरक्षा रक्षक तैनात करणे, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिग्नल यंत्रणा बसविण्याबाबत आश्वासन दिल्याचे नागरिकांनी सांगितले. या उपाययोजनांमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना सुरक्षितता मिळेल आणि वाहनचालकांवरही नियंत्रण ठेवणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांसंदर्भात आयोगाचं मोठं पाऊल; पाचही राज्यांच्या मुख्य सचिवांना महत्त्वाचे निर्देश

Land Rover Defender: 'डिफेंडर' प्रेमींसाठी गुड न्यूज! गाडीची किंमत तब्बल ३४ लाखांनी कमी कशी झाली?

Scholarship Exam : इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २१ फेब्रुवारीला होणार

Latest Marathi News Live Update : अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक; महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक 1694 मतांनी आघाडीवर

IND vs NZ T20: यांना रोखणं अवघड... किवी कर्णधाराची बोलती बंद; श्रेयस अय्यर म्हणाला, अभिषेक-वैभवने हे कसे केले याचे मला आश्चर्य

SCROLL FOR NEXT