मुंबई

रुग्णालयाला लोकार्पणाची प्रतीक्षा

CD

कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : शहराच्या पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या रुग्णालयाची इमारत तीन वर्षांपासून तयार आहे, मात्र अद्याप रुग्णालय सुरू झालेले नाही. सार्वजनिक निधीतून उभारलेल्या या इमारतीचा वापर अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांना आरोग्यसेवेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

गौरीपाडा येथील रुग्णालयाची इमारत २०२३ मध्ये महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही रुग्णालयात प्रत्यक्ष वैद्यकीय सेवा सुरू झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख महेश तपासे यांनी रुग्णालयाची पाहणी करून कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांची भेट घेतली. रुग्णालयाच्या लोकार्पणाची निश्चित तारीख जाहीर करून वैद्यकीय सेवा तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी केली आहे. प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही तपासे यांनी दिला आहे.

खासगी उपचारांचा आर्थिक भार
गौरीपाडा परिसरातील नागरिकांना उपचारांसाठी दूरच्या सरकारी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. खासगी रुग्णालयांतील उपचारांचा खर्च अनेकांना परवडत नसल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवतींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आवश्यक कर्मचारी, वैद्यकीय उपकरणे आणि अन्य सुविधांची उपलब्धता करून रुग्णालय लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी तपासे यांनी सोमवारी (ता. २६) आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे.

ऑक्सिजन सिलिंडरच्या साठवणुकीवरही प्रश्न
कोरोना काळात खरेदी केलेले ऑक्सिजन सिलिंडर आणि संबंधित वैद्यकीय उपकरणे रुग्णालयाच्या इमारतीत साठवून ठेवण्यात आले आहेत. त्यातील काही साहित्य उघड्यावर असल्याचा दावाही त्यांनी केला. वैद्यकीय साहित्याची योग्य साठवणूक न झाल्यास त्याचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संबंधित सिलिंडर आणि उपकरणे सुरक्षित, आच्छादित ठिकाणी हलवावीत, उपलब्ध साठ्याची मोजणी करावी, तसेच उपकरणांचे सुरक्षा परीक्षण आणि लेखापरीक्षण करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

१ डिसेंबरपर्यंत उद्‍घाटनाचे उद्दिष्ट निश्चित करा
गौरीपाडा रुग्णालयाच्या उद्‍घाटनाची तारीख जाहीर करून १ डिसेंबरपर्यंत रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशी मागणी तपासे यांनी केली आहे. आवश्यक कर्मचारी भरती, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून रुग्णालय कार्यान्वित करण्याची तयारी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

'माझे वडील गेलेत...' राम पूर्णेकर ओक्साबोक्शी रडले; पोलिसांनी बळजबरीने रिक्षात कोंबलं; ठाण्यात काय घडलं?

नागपूर पदवीधर निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत २१ अपक्ष उमेदवारांचं आंदोलन; आयोगाविरोधात घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

Sugar Price Hike: दिवाळीपूर्वीच साखरेचे दर भडकले! पुण्यात किलोमागे 5 रुपयांची वाढ; एक किलो कितीला? दर आणखी वाढणार?

Latest Marathi News Live Update : जालन्यातील घुंगर्डे हदगावमध्ये लहान भावानेच केली मोठ्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

ABHISHEK SHARMA: अभिषेक शर्माचा ३५ चेंडूंत शतकी धमाका! सूर्यकुमार यादवची बरोबरी, आता रोहित शर्माचा विक्रम मोडण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT