मुंबई

भिवंडीत लवकरच सिटी बस धावणार

CD

भिवंडी, ता. २७ (बातमीदार) : शहर परिसरात पालिका प्रशासनाची परिवहन सेवा नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतात. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका ई-बससेवा सुरू करणार, असे आश्वासन अर्थसंकल्पामध्ये देत होती, मात्र त्याची पूर्तता होत नव्हती, मात्र आता केंद्र सरकारच्या सहकार्याने पालिकेमार्फत भिवंडीत सिटी बस (प्रवासी बस) चालवण्यात येणार आहे.

भिवंडी शहर परिसरात सिटी बससेवा सुरू करण्यासंदर्भात पालिकेच्या मुख्य कार्यालयात महापौर नारायण चौधरी यांनी भिवंडी, तसेच कल्याण-डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. या वेळी आमदार महेश चौघुले, पालिकेचे उपायुक्त व अधिकारी वर्ग उपस्थित होते. भिवंडी नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होऊन २५ वर्षे झाली. आता सुमारे एक हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेला स्थानिकांसाठी बस सेवा सुरू करता आलेली नाही, मात्र आता लवकरच महापालिकेच्या एकूण १०० इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. या बस केंद्राकडून पालिकेला मिळणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाला शहरातील विविध भागात चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू झाल्याची माहिती महापौरांनी दिली. तसेच महापालिका प्रशासन उल्हासनगरसह भिवंडी, कल्याण या तीन शहरांना जोडणारी ई-बससेवा कार्यान्वित करण्याच्या योजनेवर काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

बससेवेमुळे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत वाढेल, त्याशिवाय शहरवासीयांना स्वस्त प्रवासाचा लाभ मिळणार आहे. पालिका प्रशासन स्वत:च्या १०० ई-बस चालवणार आहे. केंद्र सरकारसह परिवहन विभाग व कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त, प्रशासन यांच्यासोबत समन्वय साधून मंजुरी घेतली आहे. शहरातील कोंबडपाडा, टेमघर, शांतीनगर, कल्याण रोड अशा विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी जागा निश्चित करून तेथे उभारणीचे काम सुरू केले आहे.

कोंडी दूर होण्यास मदत
नवीन बससेवेमुळे शहरातील दुचाकींचे प्रमाणदेखील कमी होईल. तसेच शहर परिसरात प्रदूषणही होणार असून, पर्यावरणपूरक प्रवास असेल. परिवहन सेवेसाठी उल्हासनगरसह भिवंडी, कल्याणमध्ये समिती स्थापन केली असून, बससेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे, असे संकेत महापौरांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BP Singh Passes Away: CIDचे निर्माते-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, प्रेक्षकांचे लाडके बी. पी. सिंह यांचं निधन; मनोरंजन विश्वात शोककळा

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

Latest Marathi News Live Update : अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक; महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक 1694 मतांनी आघाडीवर

Satana News : आदिवासी गावांच्या पाणीप्रश्नावर ‘एसएनएफ’ची धडपड; हास्यजत्रेच्या मदतीने जलप्रकल्पांना बळ

Water Scarcity: ३६ तासांची पाणीकपात ५५ तासांवर, उल्हासनगर पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका

SCROLL FOR NEXT