मुरबाड, ता. २७ (वार्ताहर) : तालुक्यातील मांदोशी येथे काळू धरणाच्या संभाव्य बाधित क्षेत्रातील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या हेतूने भूसंपादनासाठी संयुक्त मोजणी आज (ता. २७) काळू आणि शाई नदी क्षेत्रातील शेतकरी, आदिवासी व महिला यांनी एकत्र येत बंद पाडली.
भातसा उपविभागीय कार्यालयाच्या आदेशाने मौजे मांदोशी गावाच्या उत्तरेला भूसंपादनाच्या हेतूने मुरबाड भूमिअभिलेख कार्यालयामार्फत मंगळवारी सरकारी मोजणी होणार होती. याची माहिती कळताच काळू आणि शाई या नद्यांच्या क्षेत्रातील स्थानिकांनी एकजूट दाखवित कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्र प्रकल्प विरोधी शेतकरी समन्वय समितीचे महासंघटक प्रशांत सरखोत यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत धरण हटवा व शेती वाचवा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. परिणामी मोजणी कार्यालयाचे उपस्थित कर्मचारी यांनी सर्वेक्षण काम बंद करून काढता पाय घेतला.
काळू धरणातील संभाव्य बाधितांचे पुनर्वसन शाई धरणाच्या बुडीत क्षेत्रात करणे म्हणजे निव्वळ शेतकऱ्यांची दिशाभूल आहे.
- पोपटराव देशमुख,
मार्गदर्शक, काळू नदी संस्था
ही मोजणी नियमबाह्य आहे; कारण प्रांताधिकारी यांनी काढलेली अधिसूचना ही कालबाह्य झाली असून नव्याने कोणतीही भूसंपादनासाठीची अधिसूचना नसताना अशी मोजणी करणे हे बेकायदा आहे.
- प्रवीण देशमुख,
समन्वयक, कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्र प्रकल्प विरोधी शेतकरी समन्वय समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.