मुंबई

न्याय मागणाऱ्या मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात; पूर्णेकर हत्याप्रकरणी ठाण्यात सर्वपक्षीयांचा एल्गार

CD

राम पूर्णेकरांना ताब्यात घेतल्याने तणाव
नौपाडा पोलिस ठाण्याबाहेर सर्वपक्षीयांचा ठिय्या
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : न्याय मिळावा म्हणून पोलिसांना दिलेली २४ तासांची मुदत संपली, पण अपेक्षित कारवाई न झाल्याने प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पूर्णेकर हत्या प्रकरणातील संतापाचा उद्रेक मंगळवारी नौपाडा पोलिस ठाण्याबाहेर पाहायला मिळाला. राम यांना ताब्यात घेतल्याची माहिती पसरताच विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक एकत्र आले. राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्या अटकेच्या मागणीसाठी ठिय्या देण्यात आल्याने परिसरातील वाहतूकही विस्कळित झाली होती.
प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी तपासात ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी राम पूर्णेकर यांनी केली होती. २४ तासांची मुदत संपल्यानंतर ते उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर निवेदन देण्यासाठी गेले, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नौपाडा पोलिस ठाण्यात आणले. यानंतर पूर्णेकर कुटुंबीयांसह समर्थकांनी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज प्रधान आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले. राजेंद्र शिंदे यांची सात वेळा चौकशी होऊनही अटकेची कारवाई का झाली नाही, असा सवाल विचारे यांनी उपस्थित केला. तपासात कथित पुरावे समोर आल्याचा दावा करत आंदोलकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

‘लाखोंच्या संख्येने आंदोलन करू’
प्रदीप पूर्णेकर यांचे भाऊ जयनाथ पूर्णेकर यांनीही संताप व्यक्त केला. “कितीही बॅरिकेडिंग करा; सर्व बाबी समोर आल्यानंतरही आरोपींना अटक का होत नाही? यापुढे लाखोंच्या संख्येने आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले मित्र असल्याचे सांगतात, मग पूर्णेकर कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ का नाही, असा सवालही त्यांनी केला. संपर्क साधूनही भेट होत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

अटकेच्या मागणीवर ठाम
विशेष तपास पथकाने मीनाक्षी शिंदे यांना चौकशीसाठी बोलावले आहे. राजेंद्र शिंदे यांचीही यापूर्वी अनेकदा चौकशी झाली आहे. या पार्श्वभूमीवर अटकेच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT