बनावट नोटांप्रकरणी तरुणाला अटक
ठाणे, ता. २७ : वडापाव खरेदीच्या बहाण्याने बनावट नोटा बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंधेरी परिसरातील समीर फारुक सय्यद (वय २८) याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या १२ बनावट नोटा, म्हणजेच सहा हजार रुपये जप्त करण्यात आले. त्याला बुधवारपर्यंत (ता. २८) पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
वागळे इस्टेट येथील पडवळनगर परिसरात नितीन गावड यांचा वडापावविक्रीचा व्यवसाय आहे. २२ ऑक्टोबरला सायंकाळी एक तरुण त्यांच्या गाड्यावर आला. त्याने सहा वडापाव मागून पाचशे रुपयांची नोट दिली. घाईत गावड यांनी त्याला चारशे रुपये परत केले. वडापाव तयार करून ठेवण्यास सांगून तरुण निघून गेला. दरम्यान, रात्री परिसरातील नागरिकांनी बनावट नोट देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पकडले. त्याला गावड यांच्याकडे आणल्यानंतर त्यांनी नोट तपासली असता ती बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. श्रीनगर पोलिसांनी समीरची झडती घेतली. त्याच्या खिशात पाचशे रुपयांच्या १२ संशयास्पद नोटा आढळल्या. नोटांच्या कागदाचा दर्जा, रंग आणि हिरवी पट्टी बनावट असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. पोलिसांनी सहा हजारांच्या नोटा जप्त करून समीरविरोधात श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
....................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.