मुंबई

विरार मधील प्रसिद्ध व्यवसायिक डॉ नितीन थोरवे यांचे बोलिंज पोलिसांवर गंभीर आरोप

CD

बोळिंज पोलिसांवर खंडणीचा आरोप
विरारमधील व्यावसायिक डॉ. थोरवे यांचा आरोप
नालासोपारा, ता. २७ (बातमीदार) ः विरारमधील प्रसिद्ध व्यावसायिक आणि निदान हेल्थकेअरचे संचालक डॉ. नितीन थोरवे यांच्यावर बोळिंज पोलिस ठाण्यात दाखल आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा समझोता करण्यासाठी १५ कोटी मागितल्याचा आरोप केला आहे, तर या गुन्ह्यात वाचण्यासाठी थोरवे यांनी हा आरोप केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मंगळवारी (ता. २७) थोरवे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे.
विरार पश्चिम बोळिंज परिसरातील एका जमिनीच्या व्यवहारात डॉ. नितीन थोरवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरविलेल्या करारनाम्याचा भंग करून २० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बोळिंज पोलिस ठाण्यात १७ जुलै २०२६ ला गुन्हा दाखल झाला आहे. फसवणुकीची रक्कम कोट्यवधींच्या घरात असल्याने पोलिसांनी हा गुन्हा खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग केला होता. या गुन्ह्याच्या विरोधात थोरवे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता, न्यायालयाने त्यांना अटक किवा त्यांच्यावर कोणतीही स्ट्राँग ॲक्शन घेऊ नये, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून, त्यांच्या मध्यस्था मार्फत सहाय्यक पोलिस निरीक्षक रूपेश दळवी यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या नावाने १५ कोटी मागितल्याचा आरोप आरोप केला आहे. एवढेच नाही तर मुंबईतील सचिन वाझे प्रकरणाप्रमाणे प्रसिद्ध व्यावसायिक यांच्या वेगवेगळ्या व्यवहाराचे कागदपत्र काढून, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळत असल्याचा आरोपही थोरवे यांनी पोलिसांवर केला आहे. पैशाच्या मागणीवरून केलेल्या तक्रारीवरून पोलिस आयुक्तांच्या आदेशाने विरार सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील जायभाये यांच्याकडे ही चौकशी सुरू आहे, तर गुन्ह्याच्या तपास हा क्राइम गुन्हे शाखा करीत आहे.
-----
५ डिसेंबरला न्यायालयाने पुढची तारीख दिली आहे. डॉ. थोरवे यांना आम्ही त्यांच्याकडील पुराव्याची अनेकवेळा मागणी केली. त्यांनी आम्हाला कोणताही पुरावा दिला नाही. मुलुंड पोलिस ठाण्यातही त्यांच्यावर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल आहे. आम्ही याचा सविस्तर तपास करीत आहोत.
़ नितीन पाटील, पोलिस निरीक्षक, वसई क्राइम ब्रँच युनिट २
़़़़़

या गुन्ह्यात माझा काही संबध नाही, मी फक्त गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच डॉ. थोरवे यांनी माझ्या विरोधात खोट्या तक्रारी करण्याची धमकी ही दिली होती. आजच्या सर्व आरोपांशी माझा काहीही संबध नाही.
़ रूपेश दळवी, सहाय्यक पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT