मुरबाड, ता. २८ (बातमीदार) : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत १५ जागांसाठी दाखल झालेले सर्व २२ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १२ नोव्हेंबरपर्यंत असल्याने त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी चिंतामण वाळकोळी, तर भटक्या जमाती व विमुक्त जाती प्रवर्गातील एका जागेसाठी यशवंत गायकर यांचा प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवर बिनविरोध निवडीची शक्यता आहे. सहकारी संस्था प्रतिनिधी मतदारसंघातील दहा जागांसाठी १४ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी दोन उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज भरल्याने या मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात आहेत. महिला राखीव मतदारसंघातील दोन जागांसाठी चार, तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत. दरम्यान, प्रशासक मंडळातील संतोष दळवी यांचे निधन झाले आहे. उर्वरित नऊ सदस्यांपैकी एकाही सदस्याने संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.
प्रशासक मंडळातील सदस्य निवडणुकीपासून दूर
मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळावर माजी आमदार गोटीराम पवार यांचे वर्चस्व होते. मात्र, निवडणूक लांबल्याने मागील वर्षी संचालक मंडळ बरखास्त करून सरकारने प्रशासक मंडळाची नियुक्ती केली होती. संतोष पवार यांच्याकडे अध्यक्षपद, तर योगेश भोईर, मिलिंद मडके, संतोष भांगरथ, अनंत शिंगोळे, हर्षला भोईर, रमाकांत सासे, चंद्रकांत बोस्टे, संतोष दळवी आणि नामदेव कंटे यांच्याकडे सदस्यपदाची जबाबदारी देण्यात आली होती. हे सर्वजण आमदार किसन कथोरे यांचे समर्थक मानले जात होते.
निवडणुकीचे चित्र
सहकारी संस्था प्रतिनिधी : १० जागा, १२ उमेदवार, १४ अर्ज (दोन उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज भरले आहेत)
महिला राखीव : २ जागा, ४ उमेदवार
इतर मागासवर्गीय : १ जागा, २ अर्ज
अनुसूचित जाती-जमाती : १ जागा, १ अर्ज
भटक्या जमाती व विमुक्त जाती : १ जागा, १ अर्ज
अर्ज माघारीची अंतिम मुदत : १२ नोव्हेंबर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.