नवी मुंबईत स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र सुरू
फिटनेस तपासणी होणार अधिक पारदर्शक
वाशी, ता. २८ (बातमीदार) : वाहनांची योग्यता (फिटनेस) तपासणी अधिक पारदर्शक, अचूक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत नेरूळ येथे स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र सोमवार (ता. २६)पासून सुरू केले आहे. यामुळे वाहनांच्या फिटनेस तपासणी प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून, मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने प्रक्रियेत मोठी पारदर्शकता येणार आहे.
या केंद्राबाबत माहिती देताना सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशीष दरगोडे यांनी सांगितले, की वाहन तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि रस्ते सुरक्षा बळकट करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाहनांची फिटनेस तपासणी अधिक अचूकपणे करता येणार असून, वाहनधारकांचा वेळही वाचणार आहे. तसेच तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊन सुरक्षित वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रामध्ये विविध तांत्रिक निकषांच्या आधारे वाहनांची योग्यता तपासली जाते. या प्रक्रियेसाठी आधुनिक उपकरणे आणि संगणकीकृत प्रणालीचा वापर केला जातो. त्यामुळे वाहनांच्या तांत्रिक स्थितीचे मूल्यमापन अधिक अचूकपणे करणे शक्य होणार आहे. फिटनेस प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेल्या तपासणी प्रक्रियेला यामुळे अधिक शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त होईल.
सुरक्षितता वाढण्यास मदत होणार
विशेषतः व्यावसायिक वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा केंद्रांचे महत्त्व अधिक आहे. वाहनांमधील तांत्रिक दोषांमुळे अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाहनांची नियमित आणि काटेकोर तपासणी आवश्यक असते. स्वयंचलित चाचणी केंद्रामुळे या प्रक्रियेला आधुनिक स्वरूप मिळणार असून, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची सुरक्षितता वाढविण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.