मुंबई

डोंबिवलीत क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी

CD

कल्याण, ता. २८ (बातमीदार) : डोंबिवलीतील लोढा हेवन खोणी येथील एका सदनिकेमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर ठाणे पोलिस आयुक्तालय गुन्हे शाखा, घटक-३ च्या पथकाने कारवाई केली. पोलिसांनी पाच जणांना रंगेहात ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून लाखोंचे लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असे एकूण दोन लाख ८२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

लोढा खोणी, मानपाडा येथील रिगलिया बिल्डिंगमध्ये काही व्यक्ती भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० क्रिकेट सामन्यावर मोबाईल आणि लॅपटॉपच्या माध्यमातून बेकायदा सट्टा खेळत व खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पथकाने फ्लॅटवर छापा टाकल्यावर, एका व्यक्तीने दरवाजा उघडला. रमेश सरजू मिश्रा (वय ३५, रा. बिहार) असून हा तिथे स्वयंपाक व साफसफाईचे काम करत असल्याचे सांगितले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता, आतील बेडरूममध्ये काही व्यक्ती लाकडी बेडवर बसून लॅपटॉप व मोबाईलच्या साह्याने क्रिकेटवर सट्टा चालवत असल्याचे निदर्शनास आले. अमित लालचंद सिंगाणी (वय ३७), कमल महेशकुमार दुलहानी ( २८), विशाल जेठानंद वाधवानी (२८), सुनील आसनदास पोपटानी (२५), पियुष रिजुमल चांदवाणी (२६) यांना ताब्यात घेतले आहे. व्हॉट्सॲप ग्रुप्स व विविध बेटिंग पॅनेल्सवर आर्थिक व्यवहारांचे संदेश आढळून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News : पालघरमध्ये प्रकल्पविरोधी संघर्ष पेटणार! ५२ संघटनांचा प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार, ३० ऑक्टोबरला जनआक्रोश सभा

Satana News : वृक्षतोड रोखा, अन्यथा जनआंदोलन; बागलाणमध्ये राष्ट्रवादीसह पर्यावरणप्रेमींचा एल्गार! माजी आमदार संजय चव्हाण यांचा इशारा

Marathi News Live Updates : पुण्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात मोठी कारवाई; १३ पोलिसांसह २५ जण अटकेत!

संकट येण्याआधी मिळतात संकेत? घरातील 5 गोष्टींबाबत काय सांगते चाणक्य नीती?

Smile Day: एका स्मितहास्यामुळे बदलू शकते का संपूर्ण नाते? जाणून घ्या मानवी जीवनातील 'स्मितहास्याची' जादू!

SCROLL FOR NEXT