सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : शहरात पाणीकपातीमुळे नागरिकांची कसरत सुरू असतानाच आता पुढील सात दिवस पिण्याचे पाणी उकळून आणि गाळून वापरण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. येवई येथील महासंतुलक जलाशयाच्या दुरुस्तीनंतर पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना पाण्याच्या वापराबरोबरच त्याच्या गुणवत्तेचीही काळजी घ्यावी लागणार आहे.
मुंबई महापालिकेच्या पिसे-पांजरापूर जलप्रणालीअंतर्गत येवई येथील महासंतुलक जलाशयाच्या कप्पा क्रमांक दोनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, बुधवारी (ता. २८) हा कप्पा पुन्हा कार्यान्वित करण्यात आला. या प्रक्रियेमुळे मुंबई, पूर्व उपनगरे तसेच ठाणे आणि भिवंडीला वितरित होणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आता जुने ठाणे म्हणून ओळख असलेल्या परिसरासाठी पुढील सात दिवस खबरदारीचे ठरणार आहेत. मुंबई पालिकेने दिलेल्या निर्देशानुसार पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी गाळून आणि उकळून घेण्याची सूचना करण्यात आली आहे, असे ठाणे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
या परिसराला फटका
हाजुरी, लुईसवाडी, काजुवाडी, जिजामाता नगर, रघुनाथ नगर, नामदेववाडी, साईनाथनगर, रामचंद्र नगर क्रमांक एक, कोपरी-आनंदनगर, राम मारुती रोड, मासुंदा तलाव परिसर, जांभळी नाका, खारकर आळी, महागिरी, कोळीवाडा, पाटीलवाडी, बी-कॅबिन, टेकडी बंगला परिसर, भक्ती मंदिर रोड आणि पाचपाखाडी या भागांना मुंबई पालिकेच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो. या भागांतील नागरिकांनी सात दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.