कल्याण, ता. २८ (वार्ताहर) : शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी आणि विस्कळित वाहतूक व्यवस्थेवरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील वाहतूक समस्यांवर येत्या दोन ते तीन दिवसांत ठोस निर्णय घेऊन उपाययोजना कराव्यात, अन्यथा शहरात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी वाहतूक नियंत्रण शाखेला निवेदन दिले आहे.
नवरात्रोत्सवात कल्याण शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळित झाल्याचा दावा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दुर्गाडी किल्ला या मार्गासह स्थानक रोड, सहजानंद चौक, दक्षिणमुखी मारुती मंदिर, मोहिंदर सिंग हायस्कूल, आधारवाडी आणि दुर्गाडी चौक परिसरात कोंडीमुळे नागरिकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी सुमारे तासभर लागत असल्याचे भोईर यांनी सांगितले. सहजानंद चौकातील सिग्नल यंत्रणा अद्याप सुरू झालेली नसल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शहरातील काही मार्गांवर एकेरी वाहतूक सुरू करण्याची गरज असून, त्याबाबतही निर्णय घेण्यात आलेला नसल्याची टीका त्यांनी केली.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षांच्या गर्दीचाही प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. भिवंडीहून येणाऱ्या रिक्षांमुळे स्थानक परिसरातील रस्ते आणि पादचारी मार्ग अडवले जात असल्याचा दावा करत, भिवंडीतील रिक्षांसाठी दुर्गाडी परिसरात किंवा रिंगरूटलगत स्वतंत्र रिक्षा स्थानक उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.