मुंबई

वाहन धुण्यासाठी बादलीभरच पाणी

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वाहन धुलाईसाठी पाण्याचा वापर मर्यादित करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेने दिले आहेत. सर्व्हिस सेंटरमध्ये पिण्याचे पाणी, विहीर किंवा कूपनलिकेतील पाण्याने वाहने धुण्यास बंदी घालण्यात आली असून, प्रेशर जेटचाही वापर करता येणार नाही. वाहन स्वच्छ करण्यासाठी बादलीतील पाणी आणि ओल्या कपड्याचा वापर करण्यास परवानगी आहे. यापूर्वीही असे निर्बंध घालण्यात आले होते. आता महापालिकेने पुन्हा अधिसूचना काढली आहे.

एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने पाणीसाठ्याच्या नियोजनावर भर दिला आहे. शासनाच्या निर्णयानुसार ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केले जाणार आहे. त्यामुळे वाहन धुण्यासारख्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ठाणे क्षेत्रामध्ये जवळपास २० लाख वाहन संख्या आहे. तर ३०० हून अधिक सर्व्हिस सेंटर विविध भागांमध्ये आहेत. प्रेशर जेटने वाहन धुण्यासही मनाई आहे. मात्र, बादलीतील पाण्याने ओल्या कपड्याने वाहन स्वच्छ करता येईल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये सहकार विभागाची अवैध सावकारीविरोधात धडक कारवाई; एकावर गुन्हा दाखल!

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT