मुंबई

माता-बाल रुग्णालयांच्या कामांना गती

CD

माता-बाल रुग्णालयांच्या कामांना गती
दिघा, कोपरखैरणेतील कामांचा महापौरांकडून आढावा; उपकरणे, मनुष्यबळ तयारीचे निर्देश
नेरूळ, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबईतील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी दिघा आणि कोपरखैरणे येथील बांधकामाधीन माता-बाल रुग्णालयांची महापौर सुजाता पाटील आणि सभागृह नेते सागर नाईक यांनी पाहणी केली. रुग्णालयांची कामे लवकर पूर्ण करून नागरिकांसाठी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने बांधकाम, उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करण्याची प्रक्रिया समांतरपणे राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
दिघा येथील रुग्णालयाचे सुमारे ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. विद्युत व्यवस्था आणि वीजपुरवठ्याशी संबंधित कामे सुरू असून, ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात ५० खाटांचे माता-बाल रुग्णालय सुरू होणार असून, पुढील टप्प्यात आणखी ५० खाटांचे सर्वसाधारण रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीनेही कार्यवाही करण्यास सांगण्यात आले.
कोपरखैरणे येथील रुग्णालयात आरोग्य विभागाने निदर्शनास आणलेल्या त्रुटी अभियांत्रिकी विभागाने तातडीने दूर कराव्यात, असे निर्देश महापौरांनी दिले. आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ यांच्याकडे कामांचा नियमित आढावा घेण्याची जबाबदारी राहणार आहे.

दिघ्यातील पाणीप्रश्नावरही चर्चा
दिघा तलावाच्या स्वच्छतेसह घाट बांधणी आणि सुशोभीकरणात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एमआयडीसीच्या शटडाऊन काळात पर्यायी पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. मोरबे धरणाच्या जलवाहिनीचे काम वर्षभरात पूर्ण झाल्यानंतर दिघा आणि ऐरोलीतील पाणीटंचाई कमी होईल, अशी माहिती सागर नाईक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Recruitment: सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी! 'कोर्ट मास्टर' पदासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट! किती टक्क्यांनी वाढला महागाई भत्ता?

टीम इंडियाला मोठा झटका! प्रसिद्ध कृष्णा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर

‘ये प्रेम मोल लिया’ गाण्यावर माधुरी दीक्षितचा भन्नाट डान्स, सोबतीला होती ही मराठी अभिनेत्री, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत संघर्षाची ठिणगी; आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून खासदार सुनील तटकरेंपासून जीवाला धोका असल्याचा दावा!

SCROLL FOR NEXT