सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात कार्यरत पात्र प्राथमिक शिक्षकांना एकस्तर (एस -१४) वेतनश्रेणी लागू करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथमधील संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे वर्षभर ते दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेने २४ ऑक्टोबरला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. या मागणीची दखल घेत डॉ. शिंदे यांनी सोमवारी (ता. २६) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. पात्र शिक्षकांना एकस्तर (एस -१४) वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मंगळवारी (ता. २७) संबंधित पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले.
पाच हजार शिक्षकांना मिळणार लाभ
जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यवाही सुरू केल्याने शहापूर, मुरबाड, भिवंडी यांसह संबंधित आदिवासी क्षेत्रांतील पात्र पाच हजार शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.