मुंबई

नैतिक जबाबदारी स्वीकारून मीनाक्षी शिंदेनी राजीनामा द्यावा

CD

मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा द्यावा
मंत्री प्रताप सरनाईक; शिवसेना शिंदे गटातून पहिल्यांदाच उघड मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या चौकशीला सामोरे जाताना मीनाक्षी शिंदे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पक्षातील महिला आघाडी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा द्यावा, असे स्पष्ट मत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. यासंदर्भातील भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कळवल्याचे त्यांनी बुधवारी सांगितले. पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना सत्ताधारी शिवसेना शिंदे गटातून पहिल्यांदाच आणि तेही एका मंत्र्यानेच राजीनाम्याची भूमिका मांडल्याने या विधानाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
राम पूर्णेकर यांना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतल्यानंतर ठाण्यामध्ये वातावरण पेटले. दुपारी नौपाडा परिसरात सुरू झालेले आंदोलन मानपाडापर्यंत पोहोचले. पहाटे तीन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. या वेळी राजेंद्र आणि मीनाक्षी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातही आंदोलकांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने बुधवारी टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपली भूमिका मांडली.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र राम यांनी राजेंद्र आणि मीनाक्षी शिंदे यांच्या अटकेसह राजीनाम्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत मीनाक्षी शिंदे यांनी पदावरून दूर व्हावे, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाकडून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही, असेही ते म्हणाले. वास्तविक मंत्री प्रताप सरनाईक यांनी एखादी भूमिका मांडली किंवा मागणी केली की ती पूर्ण होते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या या मागणीला शिंदे यांची मान्यता मिळणार की मीनाक्षी शिंदे राजीनामा देऊन हे प्रकरण शांत करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

...म्हणून उपमुख्यमंत्री शिंदेंनी भेट टाळली
पूर्णेकर यांच्या हत्याकांडानंतर वातावरण तापले होते. मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठी विरोधक आधीच ठाण्यात आले होते. अशा परिस्थितीतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेण्याचे ठरवले होते. पण वातावरण चिघळल्याने आम्हीच त्यांना कुटुंबीयांची भेट घेण्यापासून रोखल्याचा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला. दरम्यान, पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई व्हावी, हीच भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. १७ लाख रुपये दिल्याच्या आरोपांवर बोलताना संबंधित व्यक्तीला समोर आणून ठोस पुरावे सादर करावेत, असे आव्हान म्हस्के यांनी दिले. पूर्णेकर कुटुंबीयांना पोलिसांच्या तपासाबाबत शंका असल्यास त्यांनी विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) आपली बाजू मांडावी, असेही ते म्हणाले. तपासाऐवजी आरोप-प्रत्यारोप करून वातावरण तापवणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.

नेत्यांवरील आरोपांना प्रत्युत्तर देणार
एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नेत्यांवर चुकीचे आरोप होत असताना शांत बसणार नसल्याचा इशारा देण्यात आला. आपण आज आमदार आणि मंत्री आहोत ते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेमुळे, असे सांगत केवळ मंत्रिपद टिकवण्यासाठी नेत्यांवरील आरोप सहन करण्याचा प्रश्न नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. तर मस्के यांनी ठोशाला ठोशाने उत्तर देण्याचा इशारा दिला.

समाजाचा स्वार्थासाठी वापर
आगरी समाजाच्या प्रश्नांचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात असल्याचा आरोप म्हस्के यांनी केला. दि. बा. पाटील यांच्या नामकरणाचा मुद्दा एकनाथ शिंदे यांनीच मांडला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आगरी समाजातील अनेकांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT