मुंबई

आकाशकंदिलांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

CD

आकाशकंदील खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई, पनवेल आणि उरणमध्ये सजावटीच्या वस्तूंची रेलचेल; स्थानिक कारागिरांना कामाची संधी
तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू झाली आहे. विविध भागांतील बाजारपेठा रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी उजळल्या असून, घरांची सजावट करण्यासाठी नागरिकांकडून आकाशकंदील, पणत्या, विद्युत माळा आणि विविध शोभेच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. यंदा बाजारात २०० रुपयांपासून ते २,५०० रुपयांपर्यंत आकाशकंदील उपलब्ध आहेत.
शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील दुकानांमध्ये रंगीबेरंगी आकाशकंदिलांची आकर्षक मांडणी केली आहे. पारंपरिक कागदी कंदिलांसोबतच कापडी, बांबूच्या पट्ट्यांपासून तयार केलेले, ताराकृती, गोलाकार, चौकोनी आणि बहुरंगी आकाशकंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कमळाच्या आकारातील, मोराच्या रचनेतील, राजवाड्याच्या प्रतिकृतीसारखे तसेच आकर्षक नक्षीकाम आणि सजावटीच्या झालरी असलेले कंदील यंदा बाजारात उपलब्ध आहेत. कंदिलांच्या आकारानुसार, वापरलेल्या साहित्याप्रमाणे आणि सजावटीच्या प्रकारानुसार त्यांच्या किमतीत फरक आहे. साधे कागदी आकाशकंदील २०० ते ४०० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. मध्यम आकाराचे आणि अधिक आकर्षक सजावट असलेले कंदील ५०० ते १,००० रुपयांपर्यंत मिळत आहेत. तर मोठ्या आकाराचे, कलात्मक नक्षीकाम केलेले आणि विशेष सजावट असलेल्या आकाशकंदिलांसाठी १,२०० ते २,५०० रुपये मोजावे लागत आहेत. हे दर कंदिलाच्या प्रकारानुसार बदलतात.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घर, सोसायट्या आणि दुकाने सजवण्यासाठी नागरिकांकडून आकाशकंदिलांची खरेदी केली जात आहे. पारंपरिक कंदिलांसोबतच आधुनिक रचना असलेल्या कंदिलांनाही ग्राहक पसंती देत आहेत. दिवाळी जवळ येत आहे तसतशी बाजारपेठांमधील खरेदीची लगबग वाढण्याची शक्यता असून, आकाशकंदिलांच्या विक्रीतही तेजी येण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction: सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील 'किरण' DCच्या ताफ्यात; मुंबई इंडियन्सकडून जोरदार प्रयत्न, पण.. कोण आहे Kiran Navgire?

Israel Election: इस्रायलच्या निवडणूक निकालात मोठा ट्विस्ट; 'बीबी' येणार की जाणार?

Marathi News Live Updates : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयाची आघाडी मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धाराशिवमध्ये जोरदार जल्लोष!

Palghar News : पालघरमध्ये प्रकल्पविरोधी संघर्ष पेटणार! ५२ संघटनांचा प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार, ३० ऑक्टोबरला जनआक्रोश सभा

Satana News : वृक्षतोड रोखा, अन्यथा जनआंदोलन; बागलाणमध्ये राष्ट्रवादीसह पर्यावरणप्रेमींचा एल्गार! माजी आमदार संजय चव्हाण यांचा इशारा

SCROLL FOR NEXT