मुंबई

मिसेस उपमुख्यमंत्री शिंदे तुम्ही तरी न्याय द्या

CD

मिसेस उपमुख्यमंत्री शिंदे तुम्ही तरी न्याय द्या
दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नीचे गाऱ्हाणे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : खूप वर्षांपूर्वी तुम्ही तुमची दोन मुले गमावलीत. मी माझा पती गमागावला आहे. माझे दुःख, वेदना तुम्ही समजू शकता. त्यामुळे तुम्ही तरी न्याय द्या, अशी आर्त हाक देत दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी विजेता यांनी मिसेस उपमुख्यमंत्री लता शिंदे यांना गाऱ्हाणे घातले आहे. प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या होऊन महिना उलटत आला आहे. या हत्याचे प्रमुख सूत्रदार असलेले संशयित माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या विरोधातील सर्व पुरावे सादर करण्यात आले आहेत. मात्र तरीही त्यांना अटक होत नसून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीय करत आहेत. न्याय मागण्यासाठी गेलेल्या मुलगा राम याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातून मंगळवारी आंदोलन झाले. त्यानंतर शिंदे गटाने पत्रकार परिषद घेतली. या पार्शवभूमीवर विजेता पूर्णेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आता विश्वास राहिला नसल्याचे सांगत त्यांनी थेट लता शिंदे यांच्याकडे दाद मागितली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घरापर्यंत पोहचले असून सर्व बाजूने दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : नागपूर पदवीधर मतदारसंघातील अवैध मतांच्या फेरतपासणीची भाजपची मागणी निवडणूक यंत्रणेने फेटाळली!

मतदार यादीत नाव असताना फॉर्म ६ कशाला? SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

SCROLL FOR NEXT