मुंबई

ठाणेकरांच्या अंगणात पसरणार मनोरुग्णांच्या कंदिलाचा प्रकाश

CD

मनोरुग्णांच्या कलेतून आनंदाची दिवाळी
पणत्या, आकाशकंदील, तोरणांसह विविध वस्तूंची निर्मिती

ठाणे शहर, ता. २९ (बातमीदार) : रंगीबेरंगी पणत्या, आकर्षक आकाशकंदील, सुगंधी उटणे, तोरणे आणि रांगोळ्या... ठाणेकरांच्या दिवाळीला यंदा प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांच्या कलेची अनोखी झळाळी लाभणार आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांनी मेहनतीने तयार केलेल्या दिवाळीच्या वस्तू बाह्यरुग्ण विभागात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून, नागरिकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमातून रुग्णांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासही मदत होत आहे.

दिवाळीनिमित्त रुग्णालयाच्या व्यवसायोपचार विभागातर्फे रुग्णांकडून विविध आकर्षक वस्तू तयार करून घेण्यात आल्या आहेत. मातीच्या पणत्या रंगविण्यापासून ते मोर आणि कमळाच्या आकारातील दिवे सजविण्यापर्यंत रुग्णांनी आपले कौशल्य दाखवले आहे. आकाशकंदील, तोरणे, सुगंधी उटणे, फुलवाती, अरोमा कँडल्स आणि लोकरीच्या रांगोळ्यांचाही यात समावेश आहे. महिला विभागातील रुग्णांनीही उटण्याची पाकिटे, तोरणे आणि रांगोळ्या तयार केल्या आहेत. या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांकडून पसंती मिळत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

यंदा रुग्णालयाची सजावटही रुग्णांनी तयार केलेल्या वस्तूंनी केली जाणार आहे. आवारात आकाशकंदील, पताका आणि तोरणांच्या माळा लावून दिवाळीचा उत्साह निर्माण केला जाणार आहे. रुग्णांच्या हातांनी साकारलेल्या वस्तूंमुळे रुग्णालय परिसरातही सणाचा आनंद फुलणार आहे. या उपक्रमासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक, डॉ. सुधीर पुरी, डॉ. जानवी केरझरकर, डॉ. आश्लेषा कोळी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.


उपचारासोबत कौशल्यविकास
रुग्णांनी तयार केलेल्या वस्तू दिवाळीनिमित्त प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवल्या जातात. त्यातून रुग्णांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते, तर त्यांच्या कामाला आर्थिक मोबदलाही मिळतो. व्यवसायोपचार हा उपचारप्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असून, त्यातून रुग्णांची एकाग्रता, आकलनक्षमता आणि कामातील सुसूत्रता वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. उपचारानंतर रुग्णांना दैनंदिन जीवनात स्वावलंबी होण्यासाठी अशा उपक्रमांचा उपयोग होतो.

स्वावलंबनाची दिशा
“रुग्णालयात उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आम्ही कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानून त्याची काळजी घेतो. उपचारानंतर तो बरा होऊन बाहेरील जगात स्वतःच्या पायावर उभा राहावा, यासाठी तज्ज्ञांच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते,” असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी चुयेकर, समांतर सभेत मोठी घोषणा; सतेज पाटलांचा मास्टरस्ट्रोक, आता महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष

SIP Investment: फक्त 3,500 रुपयांच्या SIP मधून 3 कोटींचा फंड! करोडपती बनण्याचा फॉर्म्युला कसा काम करतो? गणित पाहा!

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

SCROLL FOR NEXT