मुंबई

अजित पवार गटाचा प्रशासनाविरोधात एल्गार

CD

अजित पवार गटाचा प्रशासनाविरोधात एल्गार
१ नोव्हेंबरला धडक मोर्चाचा इशारा!
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २९ ः पालिकेतील बेलापूर विभागांतर्गत सीवूड्स सेक्टर ४८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान घोटाळा, सेक्टर ५० मधील ९० लाख रुपयांचा अनावश्यक गटार घोटाळा आणि लिटर बिन्स/डस्टबिन खरेदीतील गंभीर गैरव्यवहारावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात महायुती सरकार सत्तेत असूनही नवी मुंबई पालिकेत केवळ शिवसेना आणि भाजपच्याच कामांना प्राधान्य दिले जाते. अजित पवार गटाच्या मागण्या व जनतेच्या प्रश्नांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा संतप्त आरोप जिल्हाध्यक्ष भरत जाधव यांनी केला आहे. पालिकेच्या या मनमानी व दुटप्पी कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येत्या १ नोव्हेंबर रोजी महापालिकेवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांच्या कररूपी पैशांची उघड-उघड लुटालूट सुरू असल्याचा आरोप करत भरत जाधव यांनी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना दिलेल्या पत्रात प्रशासकीय ढिसाळपणावर ताशेरे ओढले आहेत. सीवूड्स येथील कामांमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे चौकशी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या अहवालतून स्पष्ट झाले आहे. तसेच, विधानसभेच्या उपाध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीतही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भ्रष्टाचाराची उघडपणे कबुली दिली होती. सीवूड्स सेक्टर ५० मधील ९० लाख रुपयांच्या कामात गरज नसतानाही चुकीच्या पद्धतीने गटार बांधण्यात आले. या कामाची मूळ फाइल (नस्ती) गहाळ करून कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा व आर्थिक फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. बेलापूर विभागात बसवलेल्या ३३० डस्टबिनपैकी तब्बल ४३ डस्टबिन गायब आहेत. त्या चोरीला गेल्या की विकल्या गेल्या, याची पालिकेकडे कोणतीही नोंद नसून पोलिसात साधी तक्रारही दाखल केलेली नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या कामात तब्बल २० लाख १४ हजार २९९ रुपये किमतीची खेळणी प्रत्यक्षात कुठे बसवली, याचा कोणताही हिशोब पालिकेकडे नाही. तसेच, उद्यान कामासाठी वापरलेल्या मातीची रॉयल्टी शासनाकडे न भरता सरकारी महसूल बुडवण्यात आला आहे. एवढे सबळ पुरावे आणि स्वतः अतिरिक्त आयुक्तांचा चौकशी अहवाल समोर येऊनही संबंधितांवर कोणतीही प्रथम खबर दाखल केलेली नाही. येत्या सात दिवसांत प्रशासनाने दोषींवर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल न केल्यास हे सर्व पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडे सादर केले जातील, असा थेट इशारा भरत जाधव यांनी दिला असून १ नोव्हेंबरला काढल्या जाणाऱ्या या मोर्चात नागरिक व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उतरून पालिकेला जाब विचारणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

Latest Marathi News Update: आदिवासी महिलेचे चोरी झालेले मंगळसूत्र मिळाले

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

SCROLL FOR NEXT