सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ : शिळफाटा आणि एमआयडीसी परिसरात पाणीटंचाई तीव्र होत असताना हेदुटणे गावाच्या हद्दीत बारवी गुरुत्व जलवाहिनीलाच छिद्र पाडून पाणीचोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवली-बदलापूर पाइपलाइन रस्त्यावरील मोरया ढाब्यासमोर अनधिकृत जोडणी करून टँकरद्वारे पाणीविक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. सहा दिवसांत चार लाख लिटर पाणी चोरल्याप्रकरणी एमआयडीसीने मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हेदुटणे येथे मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून पाणी चोरले जात असल्याची चित्रफीत मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केली होती. परिसरात पाणीटंचाई जाणवत असताना पाण्याची अशा प्रकारे चोरी होत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. या चित्रफितीची दखल घेत एमआयडीसी प्रशासनाने घटनास्थळी पाहणी केली.
डोंबिवली एमआयडीसी विभागाचे उपअभियंता औदुंबर अलाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २७) एका नागरिकाने मोरया ढाब्यासमोरील जलवाहिनीतून अनधिकृत जोडणी घेऊन टँकरमध्ये पाणी भरले जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे बारवी गुरुत्व जलवाहिनीला तीन इंच व्यासाची अनधिकृत जोडणी केल्याचे आणि त्यामुळे जलवाहिनीचे नुकसान झाल्याचे आढळले. या जोडणीद्वारे पाणीचोरी करून टँकरमधून विकले जात असल्याचेही निदर्शनास आले. चोरी झालेल्या पाण्याची किंमत सुमारे १२ हजार रुपये असून, या प्रकारात मुख्य जलवाहिनीचेही नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.