मुंबई

अंबरनाथमध्ये स्वाक्षरी मोहीम

CD

सह्याद्रीच्या संरक्षणासाठी स्वाक्षरी मोहीम
वृक्षतोडीविरोधात अंबरनाथकरांचा पुढाकार

अंबरनाथ, ता. २९ (वार्ताहर) : सह्याद्री पर्वतरांगांसह भीमाशंकर अभयारण्य आणि कर्जत येथील साई डोंगराचे संरक्षण व्हावे, तसेच प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाच्या अनुषंगाने होणाऱ्या वृक्षतोडीकडे शासनाचे लक्ष वेधले जावे, यासाठी अंबरनाथमध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निसर्ग, जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पाठिंबा नोंदविला.

समाजसेवक मनोज फलके यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मोहिमेत माजी नगरसेविका पूनम पंढरीनाथ वारिंगे, तुषार बागुल, निधीश, सुविधा, माया चिंचखेडे, प्रांजल, शार्लेट, मुस्कान, पूजा, विश्वनाथ देब आणि अथर्व यांच्यासह पर्यावरणप्रेमी, प्राणीमित्र आणि नागरिक सहभागी झाले होते.

सह्याद्री परिसरातील जंगलांचे संवर्धन, वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे, हा मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. विकास प्रकल्प राबविताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याची भूमिका सहभागी नागरिकांनी मांडली. प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोड आणि वनक्षेत्रावरील संभाव्य परिणामांचा विचार करून शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही या माध्यमातून करण्यात आली.

जंगलांची हानी झाल्यास त्याचा परिणाम केवळ वृक्षसंपदेवरच नव्हे, तर वन्यजीवांच्या अधिवासावर आणि पर्यावरणीय समतोलावरही होऊ शकतो. त्यामुळे सह्याद्री, भीमाशंकर अभयारण्य आणि कर्जतच्या साई डोंगराचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती करण्यावर मोहिमेत भर देण्यात आला. ‘सह्याद्री वाचवा, वन्यजीव वाचवा’ हा संदेश देत आयोजकांनी नागरिकांना पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

Ranji Trophy 2026: मुंबईने ६४ चेंडूंत जिंकली मॅच!Tanush Kotian च्या ८ विकेट्स, तर Musheer Khan ची ऐतिहासिक कामगिरी

Latest Marathi News Update: सरपंच मंगेश साबळे यांनी भीमाशंकर येथे होणाऱ्या वृक्षतोडीचा केला विरोध

Meenakshi Shinde Resign: ठाण्यात मोठी घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरण; मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

SCROLL FOR NEXT