मुंबई

विरार-अलिबाग बाधित शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

CD

विरार-अलिबागसाठी वाढीव मोबदल्याची मागणी
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

भिवंडी, ता. २९ (बातमीदार) : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पासाठी भिवंडी तालुक्यातील खारपट्टी परिसरातील १४ गावांमधील शेतजमिनींचे संपादन करण्यात येत आहे, मात्र जमिनींचे मूल्यांकन कमी दराने झाल्याचा आरोप करत बाधित शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बुधवारी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांची भेट घेऊन निवेदन दिले.

या प्रकल्पासाठी संबंधित गावांतील जमिनींची मोजणी पूर्ण झाली असून, मोबदला स्वीकारण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र शासनाने जमिनींचे मूल्यांकन फॅक्टर-१ आणि एमएमआरडीएच्या झोननुसार केल्याने शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी मोबदला मिळत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

याच परिसरातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला फॅक्टर-२नुसार देण्यात आला आहे. त्यामुळे एकाच भागातील जमिनींसाठी दोन वेगवेगळे दर का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. विरार-अलिबाग प्रकल्पामुळे पारंपरिक शेतीचे उत्पन्नही बंद होण्याची शक्यता असल्याने नुकसानभरपाई निश्चित करताना या बाबीचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पाप्रमाणे फॅक्टर-२नुसार मोबदला द्यावा किंवा ज्या गावाला सर्वाधिक दर मिळाला आहे, तोच दर सर्व बाधित गावांसाठी लागू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. कमी दरामुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून, वाढीव मोबदल्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

Latest Marathi News Update: डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Pattankodoli Birdev Yatra Farande Baba Bhakanuk : राज्यासह केंद्रात राजकीय उलथापालथ होईल, देशात आंदोलने होतील; पट्टणकोडोली फरांडे बाबांची भाकणूक उत्साहात संपन्न

Diwali Water Supply Update in Pune : दिवाळीत पुणेकरांना मोठा दिलासा; ५ नोव्हेंबर रोजीची गुरुवारची पाणी कपात रद्द, सुरळीत पाणीपुरवठा होणार

14 Years Absconding Motorbike Thief Arrested in Partur : पाचोड पोलिसांची धडक कारवाई; १४ वर्षांपासून फरार असलेल्या मोटारसायकल चोराला परतूरमधून जेरबंद

SCROLL FOR NEXT