मुंबई

गिरवलेत गॅसचा काळाबाजार उघड

CD

गिरवलेत गॅसचा काळाबाजार उघड
१३६ सिलिंडर जप्त; १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पनवेल, ता. २९ (बातमीदार) : घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून त्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रकार पनवेल तालुक्यातील गिरवले येथे उघडकीस आला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने छापा टाकून १३६ सिलिंडर, गॅस भरण्याची उपकरणे आणि वाहनासह सुमारे १० लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय परवानगीशिवाय गॅस सिलिंडरचा साठा करून विद्युत जोडणी असलेल्या उच्चदाब पंपाच्या सहाय्याने घरगुती सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरला जात असल्याची माहिती दक्षता पथकाला मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली.
या छाप्यात भरलेले व रिकामे असे १३६ सिलिंडर, दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, दोन साधे वजनकाटे, गॅस भरण्याचे उपकरण, विविध कंपन्यांचे सुमारे १५० स्टिकर्स आणि अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आला.

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
अनधिकृतरीत्या गॅस साठवणे आणि एका सिलिंडरमधून दुसऱ्यात भरणे यामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत मेटे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पनवेल शहर पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी चुयेकर, समांतर सभेत मोठी घोषणा; सतेज पाटलांचा मास्टरस्ट्रोक, आता महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Latest Marathi News Update: आदिवासी महिलेचे चोरी झालेले मंगळसूत्र मिळाले

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

SCROLL FOR NEXT