मुंबई

जीव गेल्यानंतरही पोलिसांना जाग येत नाही? - राजन विचारे पोलीस आयुक्तांसमोर संतप्त

CD

पोलिसांना जाग येत नाही?
राजन विचारे पोलिस आयुक्तांसमोर संतप्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना (ठाकरे) माजी खासदार राजन विचारे यांनी पोलिस आयुक्तांसमोर संताप व्यक्त केला. जीव गेल्यानंतरही पोलिसांना जाग येत नाही, तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसेल, तर दाद मागायची तरी कोणाकडे, असा सवाल विचारे यांनी केला. तसेच संबंधित प्रकरणात नेमकी काय कारवाई झाली, याचा जाब त्यांनी आयुक्तांना विचारला.
मूळशी परिसरातील एका व्हिडिओचा संदर्भ देत विचारे यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. संबंधित व्हिडिओमध्ये एका तरुणाकडून पोलिसांच्या दिशेने भांडी फेकल्याचा प्रकार दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील संबंधित तरुण काल खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात उपस्थित असल्याचा दावाही त्यांनी केला. आम्ही तक्रारी करतो, मात्र कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर आपण उभे असताना हा तरुण तिथे उपस्थित होता, असे सांगून त्यांनी याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनाही विचारणा करण्याचे आवाहन केले, मात्र गेल्या एक-दोन दिवसांपासून हा तरुण कुठेही दिसत नसल्याचे सांगत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ABHISHEK SHARMA RECORD: अभिषेक शर्माच्या निशाण्यावर राहुल-हार्दिकचा विक्रम! चौथ्या T20 सामन्यात इतिहास घडवण्याची संधी

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

Latest Marathi News Update: डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

चंद्राच्या राशीबदलामुळे ‘या’ ३ राशींनी जरा जपून राहावं; बँक बॅलन्सला धोका? पैशांचं नुकसान टाळण्यासाठी कोणत्या राशींनी राहावं सावध?

Satej (Bunty) Patil on Hasan Mushrif Gokul : 'त्यांना गोकुळ दूध संघच बंद पाडायचाय!' हसन मुश्रीफांच्या टीकेनंतर बंटी पाटलांचा थेट आरोप, 'सहकारातील काळा दिवस' म्हणत मांडली रोखठोक भूमिका!

SCROLL FOR NEXT