मुंबई

शिंदेंच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर

CD

एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर
टेंभी नाक्यावर शक्तिप्रदर्शन; मुख्य रस्त्यांसह अंतर्गत मार्गांवर कोंडी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येवरून ठाण्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ गुरुवारी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमासमोर मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईसह विविध भागांतील शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले. या वेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या राजकीय शक्तिप्रदर्शनाचा फटका मात्र सर्वसामान्य ठाणेकरांना बसला. जांभळी नाका, कोर्ट नाका, चरई, सिव्हिल रुग्णालय आणि आंबेडकर रोड परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळावा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात आंदोलन जाहीर करण्यात आले. यासाठी नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत येणार, या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेतली. टेंभी नाका येथील आनंदाश्रमासमोर विविध जिल्ह्यांतील विभागप्रमुख, नगरसेवक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख तसेच युवासेना आणि संलग्न संघटनांचे पदाधिकारी जमले. त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी शिवसैनिकांना मुख्य रस्त्यावरून बाजूला केले. काही कार्यकर्ते बी. जे. हायस्कूलच्या आवारात जाऊन घोषणाबाजी करू लागल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला. अखेर पोलिसांनी जमावाला रस्त्याच्या एका बाजूला केले, मात्र तोपर्यंत मुख्य रस्त्यांसह अंतर्गत मार्गांवरील वाहतूक विस्कळित झाली होती.

पुन्हा नागरिकांना मनस्ताप
पूर्णेकर यांच्या समर्थनार्थ मंगळवारी मध्यरात्री घोडबंदर परिसरात झालेल्या आंदोलनात जाळपोळ आणि रास्ता रोको करण्यात आला होता. सुमारे पाच तास चाललेल्या या आंदोलनामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा राजकीय संघर्षामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला.

ठाणेकरांची पायपीट
दिवाळीच्या खरेदीसाठी जांभळी नाका परिसरात आलेले नागरिक, शाळेतून घरी परतणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना कोंडीचा फटका बसला. रिक्षा उपलब्ध होत नसल्याने अनेकांना भर उन्हात पायी जावे लागले. राजकीय आंदोलनांमुळे नागरिकांची गैरसोय झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

काही शाळांना सुट्टी
शहरातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर परिसरातील काही शाळांनी अचानक सुट्टी जाहीर केली. वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन शाळा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ABHISHEK SHARMA RECORD: अभिषेक शर्माच्या निशाण्यावर राहुल-हार्दिकचा विक्रम! चौथ्या T20 सामन्यात इतिहास घडवण्याची संधी

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

Latest Marathi News Update: डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

चंद्राच्या राशीबदलामुळे ‘या’ ३ राशींनी जरा जपून राहावं; बँक बॅलन्सला धोका? पैशांचं नुकसान टाळण्यासाठी कोणत्या राशींनी राहावं सावध?

Satej (Bunty) Patil on Hasan Mushrif Gokul : 'त्यांना गोकुळ दूध संघच बंद पाडायचाय!' हसन मुश्रीफांच्या टीकेनंतर बंटी पाटलांचा थेट आरोप, 'सहकारातील काळा दिवस' म्हणत मांडली रोखठोक भूमिका!

SCROLL FOR NEXT