मुंबई

‘आदित्य ठाकरेंना अटक करा’ - खासदार नरेश म्हस्के

CD

आदित्य ठाकरेंना अटक करा
खासदार नरेश म्हस्के यांची मागणी; मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी दिशा सालियनप्रकरणी शिवसेना नेते (ठाकरे) आदित्य ठाकरे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणांचा संदर्भ देत ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) निवेदन देणार असल्याचे म्हस्के यांनी जाहीर केले. गरज पडल्यास केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन मुंबईत मोर्चाही काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
प्रदीप पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पूर्णेकर हत्या प्रकरणावरून शिंदे यांना लक्ष्य करणाऱ्या ठाकरे यांनी अन्य मृत्यू प्रकरणांबाबतही भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी म्हस्के यांनी केली. ठाण्यातील चिंतामणी चौकात जाहीर सभा आणि मोर्चा काढण्याची घोषणा झाल्यानंतर ठाकरे गटाने मुंबईत पत्रकार परिषद घेतल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्यांनी केला. शिवसैनिकांच्या रोषामुळे मुंबईत पोलिस बंदोबस्तात पत्रकार परिषद घ्यावी लागल्याची टीका त्यांनी केली, मात्र या आरोपांवर ठाकरे गटाची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील तिच्या वडिलांच्या मागण्यांचा संदर्भ देत म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचाही उल्लेख करत या प्रकरणांबाबत चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यातील मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरूनही म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हिरेन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन का केले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तत्कालीन पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचा उल्लेख करत म्हस्के यांनी काही कथित संबंधांबाबतही प्रश्न उपस्थित केले. पूर्णेकर हत्या प्रकरणावरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार आदित्य ठाकरे यांना नसल्याचा दावा म्हस्के यांनी केला.

वाहतूक कोंडीबद्दल ठाणेकरांची माफी
आंदोलनांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा त्रास ठाणेकरांना झाला. त्याबद्दल शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिलगिरी व्यक्त केली. या गोंधळामुळे १० ते १५ मिनिटे वाहतुकीला त्रास झाला असेल, तर त्याबद्दल ठाणेकरांची माफी मागतो, असे ते म्हणाले. नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने आवश्यक ती काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

14 Years Absconding Motorbike Thief Arrested in Partur : पाचोड पोलिसांची धडक कारवाई; १४ वर्षांपासून फरार असलेल्या मोटारसायकल चोराला परतूरमधून जेरबंद

Supreme Court: बँक खात्यातून पैसे गेल्यास भरपाई करुन देण्याची जबाबदारी बँकेची! सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Latest Marathi News Update: डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

ABHISHEK SHARMA RECORD: अभिषेक शर्माच्या निशाण्यावर राहुल-हार्दिकचा विक्रम! चौथ्या T20 सामन्यात इतिहास घडवण्याची संधी

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

SCROLL FOR NEXT