मुंबई

आता पोलिसांविरोधात मोर्चा - पुरावे असूनही अटक होत नसल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप

CD

आता पोलिसांविरोधात मोर्चा
पुरावे असूनही अटक होत नसल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात अद्याप मुख्य सूत्रधाराला अटक का करण्यात आली नाही, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी उपस्थित केला. या प्रकरणात पोलिसांकडे पुरावे असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी थेट पोलिसांच्या विरोधातच आता मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला महिना उलटूनही तपासात अपेक्षित कारवाई झाली नाही. या पार्श्वभूमीवर गुरुवारी ठाण्यात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पोलिस आयुक्त अशुतोष ठोंबरे यांची भेट घेतली. या वेळी खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल परब उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी जे आरोपी पकडले आहेत, ते सुपारीवाले आहेत. त्यामुळे या हत्त्येच्या मुख्य सूत्रधाराला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत कारण समजणार नाही, असे ते म्हणाले. पोलिसांनाही मुख्य सूत्रधार कोण आहे, आरोपी कोण आहे, हे माहिती आहे. पोलिस प्रचंड राजकीय दबावात आहेत, असा दावाही आदित्य यांनी केला. पोलिस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सर्व यंत्रणा मॅनेज झाली आहे
मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, पण जोपर्यंत मुख्य आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. ठाणे पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही. सीबीआयसुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हातात आहे. राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्रीसुद्धा आहेत. सर्व यंत्रणा मॅनेज झाल्यामुळे आता न्याय मागायचा तरी कुठे, असे आदित्य म्हणाले. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी ठाण्याचा बीड झाल्याची टीका केली. तपासाबाबत पोलिस आयुक्तांकडे उत्तर नसेल, तर ठाणे पोलिस बरखास्त केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

14 Years Absconding Motorbike Thief Arrested in Partur : पाचोड पोलिसांची धडक कारवाई; १४ वर्षांपासून फरार असलेल्या मोटारसायकल चोराला परतूरमधून जेरबंद

Supreme Court: बँक खात्यातून पैसे गेल्यास भरपाई करुन देण्याची जबाबदारी बँकेची! सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Latest Marathi News Update: डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

ABHISHEK SHARMA RECORD: अभिषेक शर्माच्या निशाण्यावर राहुल-हार्दिकचा विक्रम! चौथ्या T20 सामन्यात इतिहास घडवण्याची संधी

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

SCROLL FOR NEXT