उल्हासनगर, ता. ३० (वार्ताहर) : ‘तुम्ही पाकिस्तानी गुप्तहेर असून दहशतवाद्यांशी तुमचे संबंध आहेत. तुमच्या विरोधात अटक वॉरंट निघाले आहे,’ अशी धमकी देत सायबर भामट्यांनी उल्हासनगरातील ७७ वर्षीय वृद्धाला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात अडकवले. एटीएस अधिकारी असल्याची बतावणी करत वारंवार व्हिडिओ कॉलद्वारे अटकेची भीती दाखवून वृद्धाच्या आयुष्यभराच्या बचतीतून अडीच लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुरुवारी (ता. २९) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर कॅम्प-५ येथील सह्याद्रीनगर परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर हरपालदास मखिजा हे सायबर भामट्यांच्या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. १३ मार्चला सकाळी त्यांच्या व्हॉट्सॲपवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला. स्वतःला पुणे एटीएस मुख्यालयातील अधिकारी प्रमोद मिश्रा असल्याचे सांगत संबंधिताने मखिजा यांच्या बँक खात्यात तीन कोटींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचा दावा केला. तसेच पाकिस्तानी गुप्तहेर आणि दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करत लखनऊ येथील न्यायालयातून अटक वॉरंट निघाल्याची भीती घातली. त्यानंतर वारंवार व्हिडिओ कॉल करून मखिजा यांच्यावर मानसिक दबाव आणण्यात आला. अटकेच्या भीतीने त्यांनी युनियन बँकेतील मुदत ठेव मोडून अडीच लाख रुपये आरटीजीएसद्वारे मनीष शुक्ला यांच्या बँक खात्यात पाठवले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात धाव घेत, प्रमोद मिश्रा, मनीष शुक्ला आणि प्रेमकुमार गौतम यांच्याविरोधात तक्रार नोंदवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.