भिवंडी, ता. ३० (वार्ताहर) : व्यावसायिकाच्या गोदामात छापा मारून पोलिस आणि कॉपीराईट विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून कारवाईची धमकी देऊन दोन लाखांची खंडणी उकळणाऱ्या पाच बनावट पोलिसांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी तालुका पोलिसांना यश मिळाले आहे. कुमार अशोक तायडे (वय ३५), दिनेश पंडीत निकम (४५), मंगेश शांताराम देवधरकर (४२, तिघे रा. मानखुर्द, मुंबई), सुरेश भिवाजी चौगुले (४२, रा. सायन मुंबई), सोनू गुरुबच्चन सिंग (३०, रा. पनवेल, रायगड) अशी अटक संशयितांची नावे आहेत. जावेद सिद्धिकी आणि प्रशांत नाईक (दोघेही रा. नवी मुंबई) अशी फरार संशयितांची नावे आहेत.
मुकेश मंगलदास पटेल यांचा सोनाळेमधील राजराजेश्वरी कंपाउंड येथे गोदामात कच्चा माल आणून कामधेनू या नावाने तूप उत्पादन कंपनी आहे. या ठिकाणी वरील सात संशयितांनी १ ऑक्टोबरला कंपनीत प्रवेश करून ते पोलिस, कॉपीराईटचे अधिकारी असल्याची बतावणी करून तुम्ही बनावट तूप तयार करता, तुमच्यावर कारवाई करून तुम्हाला अटक करून व्हिडीओ काढून तो लाईव्ह करतो व तुमच्या कंपनीची बदनामी करतो, अशी भीती घालून व्यावसायिक मुकेश मंगलदास पटेल यांना धमकावून दोन लाखांची खंडणी उकळली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने व्यावसायिकाने भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २७) तक्रार नोंदवली. खंडणीच्या गुन्ह्यात पोलिस पथकाने कुमार तायडे, दिनेश निकम, मंगेश देवधरकर, सुरेश चौगुले, सोनू सिंग यांना वेगवगेळ्या ठिकाणाहून अटक केली आहे. त्यांना भिवंडी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.