मुंबई

झोपडीधारकांना पुनर्वसनाची माहिती एका क्लिकवर

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्रता, वारस नोंदणी आणि सदनिका वाटपाची माहिती मिळविण्यासाठी आता झोपडीधारकांना प्राधिकरणाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने व्हॉट्सॲप चॅटबॉट सुविधा सुरू केली असून, एका संदेशाद्वारे घरबसल्या ही माहिती मिळविता येणार आहे.
प्राधिकरणाच्या ०२२-४१३५६८४० या दूरध्वनी क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश पाठवून नागरिकांना माहिती घेता येईल. यासाठी संबंधित झोपडीधारकाचे नाव आणि गृहनिर्माण संस्थेचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. पात्रता, वारस नोंदणी, प्रकल्पबाधित (पीएपी) तसेच सदनिका वाटपाची माहिती या सुविधेद्वारे उपलब्ध होणार आहे.

ठाण्यासह महामुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना अनेक वेळा प्राधिकरणाच्या कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागत होत्या. कागदपत्रांच्या पूर्ततेपासून ते योजनेची स्थिती अशा विविध पातळीवर माहिती मिळवताना अनेक अडचणी येत होत्या. याची दखल प्राधिकरणाने घेतली आहे.
झोपडपट्टीधारकांना पुनर्वसन योजनेशी संबंधित माहिती घरबसल्या आणि विनामूल्य मिळावी, तसेच माहिती घेण्यासाठी प्राधिकरणाच्या कार्यालयात वारंवार येण्याची गरज भासू नये, या उद्देशाने व्हॉट्सॲप चॅटबॉट ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा २४ तास सुरू राहणार असल्याने नागरिकांना कोणत्याही वेळी माहिती मिळविता येईल.

वेळ वाचणार
या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचण्यासह माहिती मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. झोपडीधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe on MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! थेट 'या' ९ परीक्षांची होणार कसून चौकशी; १६ नोव्हेंबरपूर्वी पुरावे देण्याचे कडक आवाहन

Israel Election: इस्रायल निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही! नव्या राजकीय पेचप्रसंगाचा भारतासह इराण आणि गाझावर काय परिणाम होणार?

Pandharpur News : ऊस दरावरून पंढरपूरात वाद चिघळला; विठ्ठल कारखान्यावर आमदार अभिजीत पाटील समर्थक विरुद्ध शेतकरी संघटना आमने-सामने

IND vs NZ, 4th T20I: वैभव सूर्यवंशीला बाकावर बसवणं महागात पडलं? आधी फिलिप्सने चोपलं अन् मग गोलंदाजांनी सतावलं; भारताचा न्यूझीलंडकडून दारुण पराभव

India U-19 squad for Asia Cup: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर! ज्युनियर सेहवाग, द्रविडची निवड; India vs Pakistan सामन्यात धुमाकूळ घालण्यास सज्ज

SCROLL FOR NEXT