मुंबई

खमंग चव, शुद्धता आणि परंपरेचा गोडवा!

CD

खमंग चव, शुद्धता आणि परंपरेचा गोडवा!
बेलापूरच्या अर्बन हाटमध्ये रंगणार उमेद दिवाळी फराळ महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० ः दिवाळीचा सण जवळ आला की घरोघरी आणि बाजारपेठेत खमंग फराळाचा सुगंध दरवळू लागतो मात्र आजकाल बाजारात मिळणारा भेसळयुक्त आणि जुना साठवलेला फराळ पाहून आरोग्याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे, परंतु उमेद-राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे बेलापूर येथे अर्बन हाट येथे ३ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत उमेद दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना त्यांच्या डोळ्यांसमोर तयार केलेला १०० टक्के शुद्ध आणि गरमागरम ताजा फराळ मिळणार आहे.
या महोत्सवातील फराळाची उत्तम गुणवत्ता आणि अस्सल चव टिकवून ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. फराळ बनवण्यासाठी लागणारे तेल, बेसन व इतर सर्व साहित्य हे थेट शेतकरी महिलांच्या शेतातून आलेले आहे. त्यामुळे या फराळामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसून ग्राहकांना अस्सल व शुद्धतेची पूर्ण हमी मिळणार आहे. सामान्यतः बाजारात आधीच पॅकबंद केलेला फराळ मिळतो, परंतु या महोत्सवात महाराष्ट्रातील बचत गटांच्या कुशल महिला ग्राहकांच्या डोळ्यांसमोर गरमागरम आणि खमंग चकल्या, लाडू, करंज्या आणि चिवडा तयार करून देणार आहेत. विशेष म्हणजे, ग्राहकांच्या आवडीनुसार व मागणीनुसार साजूक तुपातील किंवा शेंगदाणा तेलातील फराळ बनवून मिळण्याची खास सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर ग्राहकांना स्वतः फराळ बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधीही येथे मिळणार आहे. महोत्सव परिसरात आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून कडक नियमांचे पालन केले जात आहे. फराळ तयार करणाऱ्या महिला हॅन्ड ग्लव्हज, ऍप्रन आणि हेअर कॅप घालून पूर्ण स्वच्छतेत हा फराळ बनवतील. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाला हातभार लावत, आरोग्यासाठी उत्तम आणि अस्सल चवीची दिवाळी साजरी करण्यासाठी नवी मुंबई व परिसरातील नागरिकांनी बेलापूर रेल्वे स्टेशनजवळील ‘अर्बन हाट’ येथील या फराळ महोत्सवाला नक्की भेट द्यावी, असे आवाहन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे-पाटील यांनी केले आहे.

थोडक्यात माहिती :
कार्यक्रम : उमेद दिवाळी फराळ महोत्सव २०२६
दिनांक : ३ ते ७ नोव्हेंबर २०२६
ठिकाण : अर्बन हाट, बेलापूर रेल्वे स्थानकजवळ, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe on MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! थेट 'या' ९ परीक्षांची होणार कसून चौकशी; १६ नोव्हेंबरपूर्वी पुरावे देण्याचे कडक आवाहन

Smile Day : खळखळून हसा! एक नोव्हेंबरला साजरा करा ‘स्माइल डे’; ‘सकाळ माध्यम समूहा’चा उपक्रम

Israel Election: इस्रायल निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही! नव्या राजकीय पेचप्रसंगाचा भारतासह इराण आणि गाझावर काय परिणाम होणार?

Marathi News Live Updates : रखडलेल्या तुर्भे उड्डाणपुलासाठी ठाकरे गटाचे रास्ता रोको

RailMadad: प्रवासात तुमच्या सामानाची चोरी झाल्यास रेल्वेकडून भरपाई मिळते का? जाणून घ्या काय आहेत नियम?

SCROLL FOR NEXT