मुंबई

''फ्लोटिंग'' प्रकाशप्रदूषणाचा फ्लेमिंगोंना धोका!

CD

‘फ्लोटिंग’ प्रकाशप्रदूषणाचा फ्लेमिंगोंना धोका!
महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या प्रस्तावाला पर्यावरणवाद्यांचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० ः दरवर्षी हजारो मैलांचा प्रवास करून मुंबई आणि उपनगराच्या किनाऱ्यावर विसावणाऱ्या लालपरी पक्ष्यांचे अर्थात फ्लेमिंगोंचे यंदा निसर्गरम्य किनाऱ्याऐवजी डोळे दिपवणाऱ्या डिजिटल होर्डिंगने स्वागत होणार आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने मुंबईच्या सागरी हद्दीत तरंगत्या बार्जेसवर डिजिटल आणि तीव्र प्रकाशमान जाहिरात फलक बसवण्याचा घाट घातला आहे. सरकारच्या या महसूलकेंद्री धोरणामुळे मुंबईचा समुद्र आणि किनारपट्टी केवळ दिसायलाच विद्रूप होणार नाही, तर स्थलांतरित पक्षी आणि सागरी जैवविविधतेसाठी हा निर्णय ‘किलर’ ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रस्तावाला नवी मुंबईतील नॅटकनेक्ट या पर्यावरणवादी संघटनेने विरोध दर्शवला आहे.
केवळ कोट्यवधी रुपयांचा महसूल उकळण्यासाठी मेरीटाइम बोर्डाने सागरी परिसंस्थेला वेठीस धरले आहे. पाण्यावर चमकणारे हे तीव्र कृत्रिम प्रकाशझोत स्थलांतरित पक्ष्यांची उड्डाण दिशा पूर्णपणे विस्कळित करतील. नवी मुंबईतील नेरूळ येथील डीपीएस तलावाजवळ एप्रिल २०२४ मध्ये तीव्र एलईडी दिव्यांमुळे दिशाभूल होऊन अनेक फ्लेमिंगो पक्ष्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या गंभीर दुर्घटनेची राष्ट्रीय हरित लवादाने स्वतःहून दखल घेतली होती. या अपघातातून धडा घेण्याऐवजी प्रशासन आता थेट संपूर्ण मुंबई किनाऱ्यावरच असे प्रकाश-सापळे उभारण्याच्या तयारीत आहे. तीव्र आणि झगमगणारे फलक पाहून हवेत उडणारे फ्लेमिंगो दिशाभूल होऊन होर्डिंग किंवा जहाजांवर आदळण्याची आणि हजारो पक्ष्यांचा जीव जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
--------------------------------
सागरी अन्नसाखळी उद्ध्वस्त!
या योजनेचा फटका पक्ष्यांनाच नाही, तर समुद्राच्या पोटात राहणाऱ्या जीवांनाही बसणार आहे. तीव्र निळ्या आणि पांढऱ्या एलईडी प्रकाशामुळे सूक्ष्म प्लँक्टनच्या नैसर्गिक हालचाली थांबतात. यामुळे लहान व मोठ्या माशांच्या खाद्यशोधण्याच्या पद्धती बिघडतात. बार्जेस चालवण्यासाठी वापरले जाणारे जनरेटर आणि सतत होणारी नौकांची वर्दळ यामुळे समुद्रातील शांतता भंगून जलचरांचे अधिवास नष्ट होतील. या प्रकल्पाला किनारपट्टी नियमन क्षेत्राच्या परवानग्या मिळाल्या आहेत का? स्वतंत्र पर्यावरणीय प्रभाव मूल्यमापन केले गेले आहे का? यावर प्रशासनाने बाळगलेले मौनाबाबत पर्यावरणवाद्यांकडून संशयास्पद आहे.
-----------------------------------
जागतिक नियमांना पायदळी तुडवणारा कारभार
संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतरित प्रजाती संवर्धन कराराने २०२४ मध्ये प्रकाशप्रदूषणाविरुद्ध कठोर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. तसेच ‘डीम दी लाइट्स फॉर बर्ड्‌स ॲट नाइट’ ही जागतिक चळवळ जगभरात राबवली जात आहे. जागतिक स्तरावर रात्रीचे कृत्रिम दिवे मंद करण्याचे आवाहन केले जात असताना, आपल्याकडे मात्र समुद्रात डिजिटल लखलखाट पसरवला जात आहे.
-------------------------------------
नॅटकनेक्टचे प्रशासनाला सवाल
पर्यावरणप्रेमी संस्था ‘नॅटकनेक्ट फाउंडेशन’ आणि ‘स्वर्णश्री हॅबिटॅट रिस्टोरर फाउंडेशन’ यांनी यावर प्रशासनाकडे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकल्पासाठी सागरी शास्त्रज्ञ आणि वन्यजीव तज्ज्ञांचा सल्ला घेतला गेला आहे का?, या प्रकाशप्रदूषणामुळे पक्षी आणि सागरी जीवांचा मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी मेरिटाइम बोर्ड स्वीकारणार का? आणि स्वतंत्र पर्यावरणीय अभ्यास होईपर्यंत या निसर्गविरोधी प्रकल्पाला तातडीने स्थगिती का दिली जात नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RO-KO ची न्यूझीलंडमध्ये जोरदार तयारी! BCCI ने विराट-रोहितचा शेअर केला खास Video; कधी सुरू होणार वनडे मालिका?

Amit Shah: संसदेत होणार 'आर-पार'ची लढाई! 'मत चोरी'च्या मुद्द्यावरुन अमित शाहांचं राहुल गांधींसह अखिलेश यादवांना आव्हान

Marathi News Live Updates : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे ३१ ऑक्टोबरच्या परीक्षा रद्द, आता ११ नोव्हेंबरला होणार!

Narayangaon Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाची जुन्नर व पारनेर तालुक्यात धडाकेबाज कारवाई; लाखो रुपये किमतीचा बनावट विदेशी मद्य साठा जप्त, तीन आरोपींना अटक

Shirur Crime : शिरूर पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारात दोन गटांत झोंबाझोबीसह लाथाबुक्क्यांची फ्रि स्टाईल; महिलांचाही सहभाग

SCROLL FOR NEXT