मुंबई, ता. ३० : विविध उत्पादनांसाठी कॉम्प्रेस्ड एअर तयार करणाऱ्या कॉम्प्रेसरच्या श्रेणीतील नवे एबी सीरिजचे ऑइल फ्री स्क्रू एअर कॉम्प्रेसर, एलगी इक्विपमेंट्सतर्फे ड्रिंकटेक इंडिया २०२६ मध्ये सादर करण्यात आले.
कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष भावेश करीया तसेच अध्यक्ष विकास तिरुवरुलू यांनी बुधवारी ही माहिती पत्रकारांना दिली. हे कॉम्प्रेसर अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणासाठी उत्तम असल्याचा कंपनीचा दावा आहे. कॉम्प्रेसर तयार करताना हा कॉम्प्रेसर पाणी व ऊर्जेचा आणि इतर संसाधनांचा चांगल्या प्रकारे वापर करतो. त्यामुळे कॉम्प्रेसरचा देखभाल खर्च कमी होतो आणि उत्पादन प्रक्रिया विश्वासार्ह प्रकारे होते, असे त्यांनी सांगितले.
या कॉम्प्रेसरमध्ये ऊर्जेचा कार्यक्षम वापर होतो. या कॉम्प्रेसरचे सुटे भाग दीर्घकाळ टिकणारे आहेत. कॉम्प्रेसरमधील हवेचा पुरवठा आपोआप नियंत्रित होतो. त्यामुळे अनावश्यक ऊर्जा वापर होत नाही. ४० हजार तासांच्या वापरातील कॉम्प्रेसर खरेदीचा खर्च, वीज खर्च आणि देखभाल खर्च विचारात घेतल्यास एकूण खर्चात १३ टक्के बचत होऊ शकते, असा कंपनीचा अंदाज आहे.
या कॉम्प्रेशन चेंबरमध्ये वंगण तेलाऐवजी पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे वंगण तेलविरहित कॉम्प्रेस्ड एअर मिळते. या यंत्रात पाण्याचा पुनर्वापर होतो आणि जमा झालेले पाणी वापरूनच पाण्याची पातळी भरून काढली जाते. त्यामुळे बाहेरून पाणीपुरवठा करण्याची व बाह्य पाणीपंपाची गरज भासत नाही. पाण्यावरील प्रक्रियेसाठी अतिरिक्त यंत्रणेचा खर्च होत नाही आणि देखभालीची गरज आणि अन्य उपकरणांचा वीज वापरही कमी होतो. खाद्यपदार्थ, मिठाई, बेकरी उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, दूध, पेय, पॅकेजिंग या क्षेत्रात कॉम्प्रेस्ड एअरची गरज असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.