सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : महापालिका आणि परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्त प्रत्येकी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुदानात ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून, महापालिकेतील आशा वर्कर्सनाही प्रत्येकी सहा हजाराची दिवाळी भेट मिळणार आहे. उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी गुरुवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत केली.
ठाणे महापालिका आणि परिवहन सेवेतील हजारो कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे. सानुग्रह अनुदानाची रक्कम दिवाळीपूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनुदानाच्या रकमेवर चर्चा करून यंदा २५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना २४ हजार ५०० रुपये देण्यात आले होते. या निर्णयाचा सहा हजार २९४ कर्मचारी, परिवहन सेवेतील एक हजार २८५ कायम कर्मचारी आणि थेट कंत्राटी व इतर ३६८ कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. या सानुग्रह अनुदानापोटी महापालिकेवर सुमारे २० कोटी ११ लाखांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.