मुंबई

फार्मसीच्या १५ हजार ६७१ जागा रिक्त

CD

फार्मसीच्या १५ हजार ६७१ जागा रिक्त
मुंबई, ता. ३० : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी चार वर्षांचा पूर्ण-वेळ पदवी औषधनिर्माणशास्त्र-बी. फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या व सहा वर्षांचा पूर्ण-वेळ पदवी फार्म.डी. या अभ्यासक्रमामध्ये यावर्षी राज्यातील एकूण ५३० फार्मसी महाविद्यालयातून बी. फार्मसी, फार्म.डी. या अभ्यासक्रमाच्या एकूण ४७ हजार १९२ जागेपैकी ३१ हजार ५२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामध्ये ‘फार्मसी’च्या १५ हजार ६७१ जागा रिक्त राहिल्या.

राज्यात यावर्षी बी. फार्मसी, फार्म.डी. अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी ३१ जुलै २०२६ पासून सुरू झाली होती. २३ ऑगस्ट २०२६ रोजी ही ऑनलाइन नोंदणी संपली, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्या व संस्थात्मक फेरीअखेर राज्यातील एकूण ५३० फार्मसी महाविद्यालयातून बी. फार्मसी, फार्म.डी. या अभ्यासक्रमाच्या एकूण ४७ हजार १९२ जागेपैकी ३१ हजार ५२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाच्या चार फेऱ्या संपन्न झाल्यानंतर संस्थात्मक फेरी संपन्न झाली. यावर्षी फेरीनुसार प्रवेश किती झाले हे पहिले असता पहिल्या फेरीमध्ये १६ हजार ५२८ विद्यार्थ्याचे प्रवेश झाले होते. दुसऱ्या फेरीत सात हजार २८३, तिसऱ्या फेरीत, दोन हजार ८९५ व चौथ्या फेरीत एक हजार ९३८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. या सर्व फेरीमध्ये मिळून यावर्षी ३१ हजार ५२१ विद्यार्थ्यांनी बी. फार्मसी, फार्म.डी. महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.


मागील चार वर्षांत झालेले प्रवेश
शैक्षणिक वर्ष झालेले प्रवेश
२०२६-२७ ३१,५२१
२०२५-२६ ३२,९५३
२०२४-२५ ३१,८२७
२०२३ -२४ २८,३४०
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Diwali gift to Farmers : नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून जुंपली असतानाच 'गोकुळ'चा दूध उत्पादकांना मोठा दिलासा! दिवाळीच्या तोंडावर खात्यात जमा होणार 'इतके' रुपये

Marathi News Live Updates : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी !

Kolhapur Sugarcane Rate Meeting Chaos : पालकमंत्र्यांसमोरच ऊस दर बैठकीत मोठा राडा! पहिल्या उचलीच्या 'त्या' आकड्यावर शेतकरी ठाम; कारखानदारांची उडाली झोप

मुंबईच्या नॅशनल क्रिकेट क्लबच्या 'टॅलेंट हंट'मधून ४५ प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंची निवड!

Dhoni ने स्मृती मानधनाला वर्ल्ड कप जिंकल्यावर WhatsApp वर केला खास मेसेज; कॅप्टनकूल म्हणाला, 'फक्त तिचाच नंबर माझ्याकडे...'

SCROLL FOR NEXT