मुंबई

प्राकृत, पालीतील साहित्याचे मराठीत भाषांतर !

CD

प्राकृत, पालीतील साहित्याचे मराठीत भाषांतर!
पहिल्यांदाच जैन साहित्याच्या विश्वकोशाची निर्मिती
मुंबई, ता. ३० : मराठी आणि पाली भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी ज्या जैन तीर्थंकरांनी पाली, प्राकृत इत्यादी भाषांमध्ये विपुल प्रमाणात साहित्य निर्माण केले, त्याचा मराठीत अनुवाद केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जैनांनी निर्माण केलेल्या पाली, प्राकृत इत्यादी भाषांतील साहित्याच्या आधारावर पहिल्यांदाच राज्यात जैन साहित्याचा विश्वकोश तयार केला जाणार असल्याची माहिती राज्य जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी (ता. ३०) मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ललित गांधी यांनी सांगितले, की जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी व अल्प उत्पन्न गटातील लोकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या कर्ज योजनांच्या प्रत्यक्ष वितरणाचा प्रारंभ रविवारी (ता. १) घाटकोपर येथील पारसधाम, पोलिस हॉकी ग्राउंड येथील कार्यक्रमात होणार आहे. पहिल्या टप्प्यात महासती चंदनबाला महिला स्वयंरोजगार कर्ज योजनेतून अत्यल्प उत्पन्न गटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी १ लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, कर्मवीर भाऊराव पाटील उच्च शिक्षण कर्ज व्याज परतावा योजनेद्वारे उच्च शिक्षणासाठी २० लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे शेठवालचंद हिराचंद स्वयंरोजगार कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत व्यवसाय-उ‌द्योगासाठी ९० लाखांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे. तसेच तिन्ही योजनांतील ५११ लाभार्थ्यांना ५१ कोटी रुपयांचे कर्ज व कर्ज मंजुरी प्रत वितरित करण्यात येणार असल्याचेही ललित गांधी यांनी सांगितले.

महामंडळाकडून प्रयत्न
जैन तीर्थंकर आणि इतर साहित्यिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाली, प्राकृत या भाषांमध्ये साहित्य निर्माण केले असून, त्याची ओळख मराठी भाषकांना व्हावी आणि ते सर्व साहित्य मराठीत अनुवादित व्हावे, यासाठी महामंडळाकडून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. जैन समाजातील आवश्यक साहित्य आणि सामुग्रीची निर्मिती करणे, अतिप्राचीन जैन तीर्थांचे संरक्षण आणि संवर्धन यासोबत प्राचीन ग्रंथांचे संवर्धन आणि पुनर्लेखन याचाही यात समावेश असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश! शेंदूरवाड्यात १० केव्हीचा नवीन ट्रान्सफॉर्मर सुरू; शेतकऱ्यांना आता आठ तास वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा

Rafale Marine : भारतीय नौदलाच्या हवाई सामर्थ्यात भर! आयएनएस विक्रांतवर राफेल मरीनचे यशस्वी लँडिंग

Marathi News Live Updates : समृद्धी महामार्गावर हेक्टरी एक लाख रुपये भरपाईसाठी आंदोलन करणारे आमदार नितीन देशमुखांना पोलिसांनी घेतले ताब्यात!

RO-KO ची न्यूझीलंडमध्ये जोरदार तयारी! BCCI ने विराट-रोहितचा शेअर केला खास Video; कधी सुरू होणार वनडे मालिका?

Amit Shah: संसदेत होणार 'आर-पार'ची लढाई! 'मत चोरी'च्या मुद्द्यावरुन अमित शाहांचं राहुल गांधींसह अखिलेश यादवांना आव्हान

SCROLL FOR NEXT