मुंबई

पूर्णेकर समर्थकांना पोलिसांकडून थर्ड डिग्री दिल्याचा आरोप

CD

समर्थकांना पोलिसांची अमानुष मारहाण
जयनाथ आणि राम पूर्णेकर यांचा आरोप; कापूरबावडी पोलिस ठाण्यात धाव
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : प्रदीप पूर्णेकर हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अमानुष मारहाण केल्याचा गंभीर आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. कापूरबावडी पोलिस ठाण्यात तरुणांना थर्ड डिग्री देण्यात आली. तसेच अपमानास्पद कृत्य करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. याची माहिती मिळताच माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर आणि राम पूर्णेकर यांनी शुक्रवारी कापूरबावडी पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना जाब विचारला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पूर्णेकर हत्या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची गुन्हे अन्वेषण शाखेकडून चौकशी सुरू असताना राम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर समर्थकांनी नौपाडा पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. मीनाक्षी आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणी करत समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या आंदोलनाचे पडसाद मानपाडा, कोलशेत आणि बाळकुम परिसरातही उमटले. नौपाडा-हरिनिवास मार्गावर दीर्घकाळ रास्तारोको झाल्याने वाहतूक विस्कळित झाली होती. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या. याप्रकरणी पोलिसांनी २५० हून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आंदोलनात सहभागी असलेल्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप आहे.

चौकशीसाठी बोलावले
या आरोपांबाबत कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांनी सांगितले की, गुन्हा दाखल असल्याने दोघांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Diwali gift to Farmers : नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून जुंपली असतानाच 'गोकुळ'चा दूध उत्पादकांना मोठा दिलासा! दिवाळीच्या तोंडावर खात्यात जमा होणार 'इतके' रुपये

Marathi News Live Updates : पुणे जिल्ह्यात पीएम किसान योजनेतून १,९३७ कोटींचा निधी वितरीत; पंतप्रधान मोदींच्या हस्ते २४ व्या हप्त्याचे वितरण!

Kolhapur Sugarcane Rate Meeting Chaos : पालकमंत्र्यांसमोरच ऊस दर बैठकीत मोठा राडा! पहिल्या उचलीच्या 'त्या' आकड्यावर शेतकरी ठाम; कारखानदारांची उडाली झोप

मुंबईच्या नॅशनल क्रिकेट क्लबच्या 'टॅलेंट हंट'मधून ४५ प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंची निवड!

Dhoni ने स्मृती मानधनाला वर्ल्ड कप जिंकल्यावर WhatsApp वर केला खास मेसेज; कॅप्टनकूल म्हणाला, 'फक्त तिचाच नंबर माझ्याकडे...'

SCROLL FOR NEXT