मुंबई

- रविवारी ठाण्यात लोकतंत्र बचाव पदयात्रा

CD

भाजपची रविवारी ठाण्यात लोकतंत्र बचाव पदयात्रा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : आंदोलनाच्या नावाखाली वाढत असलेली अराजकता आणि भीडतंत्राच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने रविवारी (ता. १) लोकतंत्र बचाव पदयात्रा काढण्यात येणार आहे. लोकशाही आणि संविधानाचे रक्षण, तसेच सामाजिक सुव्यवस्था कायम ठेवण्याचा संदेश या पदयात्रेतून देण्यात येणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. या वेळी प्रदेश स्तरावरील प्रमुख नेते, जिल्ह्यातील आमदार आणि खासदारही उपस्थित राहणार आहेत. रविवारी सकाळी ९ वाजता पाचपाखाडी येथील परमार्थ निकेतन, ठाणे महापालिकेजवळून पदयात्रेला सुरुवात होईल. चंदनवाडी, अलमेडा चौक, दगडी शाळा मार्गे ही पदयात्रा तलावपाळी येथे पोहोचेल. तेथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासमोर पदयात्रेची सांगता होणार असून, त्यानंतर उपस्थित नेत्यांचे मार्गदर्शन होईल. समाजात वाढत असलेल्या अराजकतेविरोधात लोकशाही मार्गाने निषेध नोंदवण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन केल्याचे भाजपने म्हटले आहे. या पदयात्रेत नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप सुरेश लेले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Diwali gift to Farmers : नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून जुंपली असतानाच 'गोकुळ'चा दूध उत्पादकांना मोठा दिलासा! दिवाळीच्या तोंडावर खात्यात जमा होणार 'इतके' रुपये

Marathi News Live Updates : पुणे जिल्ह्यात पीएम किसान योजनेतून १,९३७ कोटींचा निधी वितरीत; पंतप्रधान मोदींच्या हस्ते २४ व्या हप्त्याचे वितरण!

Kolhapur Sugarcane Rate Meeting Chaos : पालकमंत्र्यांसमोरच ऊस दर बैठकीत मोठा राडा! पहिल्या उचलीच्या 'त्या' आकड्यावर शेतकरी ठाम; कारखानदारांची उडाली झोप

मुंबईच्या नॅशनल क्रिकेट क्लबच्या 'टॅलेंट हंट'मधून ४५ प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंची निवड!

Dhoni ने स्मृती मानधनाला वर्ल्ड कप जिंकल्यावर WhatsApp वर केला खास मेसेज; कॅप्टनकूल म्हणाला, 'फक्त तिचाच नंबर माझ्याकडे...'

SCROLL FOR NEXT