मुंबई

उल्हासनगर रेल्वे स्थानकच्या बाहेरील स्कायवॉकचे पत्रे कोसळले; रिक्षाचालकासह दुचाकीस्वार जखमी!

CD

उल्हासनगरमध्ये स्कायवॉकचे
पत्रे कोसळले; दोघे जखमी
उल्हासनगर, ता. ३१ (वार्ताहर) : रेल्वे स्थानकाबाहेरील जीर्ण स्कायवॉकचे पत्रे शनिवारी (ता. ३१) अचानक कोसळल्याने रिक्षाचालकासह दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. हजारो प्रवाशांची दररोज वर्दळ असलेल्या परिसरात ही दुर्घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी सुमारे १७ ते १८ वर्षांपूर्वी स्कायवॉक उभारण्यात आला होता; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून त्याची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्कायवॉकची अवस्था जीर्ण झाली आहे. अशातच त्याचे पत्रे अचानक कोसळल्याने खालील रस्त्यावरून जाणारा रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार तरुण जखमी झाले. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही; मात्र स्कायवॉकच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
.....
दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
रेल्वे स्थानक परिसरात दररोज हजारो प्रवाशांसह रिक्षा आणि दुचाकींची मोठी वर्दळ असते. त्यामुळे गर्दीच्या वेळी अशी दुर्घटना घडली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. स्कायवॉकच्या दुरवस्थेकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट न पाहता प्रशासनाने स्कायवॉकचे तातडीने संरचनात्मक परीक्षण करावे. धोकादायक भाग सुरक्षित करून आवश्यक दुरुस्ती करावी. स्कायवॉक वापरण्यास अयोग्य असल्यास तो पाडण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 5th T20I: शेवटचा सामन्यात होणार मोठे प्रयोग? वैभव सूर्यवंशी, कुलदीपला मिळणार Playing XI मध्ये संधी?

Marathi News Live Updates : गोकुळ दूध संघातर्फे उत्पादकांना ११७ कोटींची 'दिवाळी भेट'; अंतिम दूध दर फरक थेट बँक खात्यात जमा

Omer Abdullah: जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?

Foreign Deputy PM daughter Bollywood Ambition : "ते नेते माझ्या मागेच लागलेत!"; जगातील 'त्या' बलाढ्य देशाच्या उपपंतप्रधानांच्या मुलीला काम करायचंय बॉलिवूडमध्ये; केंद्रीय मंत्र्यांचा मोठा खुलासा

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

SCROLL FOR NEXT