मुंबई

‘बोध कीर्तन’मधून संजय राऊत यांचा तुरुंगातील १०५ दिवसांचा अनुभव शब्दबद्ध;

CD

तंत्रयुगात विचारशक्ती धोक्यात!
प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांची खंत
मुंबई, ता. ३१ : अलीकडे तंत्रज्ञान युगात माणसाची विचारशक्ती कमी होत चालली आहे. ती जपण्यासाठी वाचन आणि चिंतन महत्त्वाचे आहे. मोबाईलवेडेपणामुळे शब्द, अक्षरं येत्या काळात संग्रहालयात जाण्याची भीती शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. खासदार संजय राऊत लिखित आणि मेहता पब्लिशिंग हाउस प्रकाशित ‘बोध कीर्तन’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. दादर येथे झालेल्या या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र आणि प्रकाशक अखिल मेहता उपस्थित होते.
संजय राऊत यांनी लेखन प्रवासासह तुरुंगात घालवलेल्या १०५ दिवसांतील अनुभव, चिंतन आणि वाचनातून मिळालेले विचार ‘बोध कीर्तन’मध्ये मांडले आहेत. त्याच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या लेखनशैलीचे कौतुक केले. राऊत यांच्याकडे शब्दांचे सामर्थ्य पुरेपूर आहे. शब्दांच्या ओव्या कधी म्हणायच्या आणि शिव्या कधी द्यायच्या, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. तुरुंगातील नरकातही स्वर्ग शोधणारा हा माणूस प्रतिकूल परिस्थितीतही चिंतन, मनन करून त्यातून पुस्तकाची निर्मिती करतो, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. परंतु अलीकडे तंत्रज्ञानाच्या युगात माणसाची विचारशक्ती कमी होत असून, प्रत्येकाने वाचन आणि चिंतनासाठी वेळ देण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी ‘बोध कीर्तन’मधून प्रतिकूल परिस्थितीतही माणसाने शहाणपणाने आणि प्रामाणिकपणे जगण्याचा संदेश मिळत असल्याचे सांगितले. या पुस्तकाचे वाचन तरुणांसाठीही मार्गदर्शक ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
-----
सरकारी भाषा सुबोध असावी!
मराठी भाषेतील दर्जेदार लेखनासाठी उत्तम साहित्य वाचण्याची गरज आहे. सरकारी कार्यालये आणि न्यायालयांमधील मराठी भाषा अधिक सुबोध असावी, अशी अपेक्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
---
पुस्तकांचेही व्हावे महोत्सव!
महाराष्ट्रात खाद्यपदार्थ, कपड्यांचे उत्सव साजरे होतात; मग पुस्तकांचाही उत्सव का होऊ नये? प्रत्येक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हा उत्सव व्हायला हवा, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली. ‘बोध कीर्तन’ पुस्तकात सामाजिक, राजकीय आणि साहित्यिक विषयांसह कविता, उर्दू शायरी आणि विविध विचारांचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुस्तकाची संकल्पना मुली विदिता आणि पूर्वा यांच्या कल्पनेतून पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

Who Is Nidhi Razdan : उमर अब्दुल्लांशी लग्न करणाऱ्या निधी राजदान कोण? त्यांची संपत्ती किती?

Nilanga News : 'पीएम श्रीच्या' शाळेचे बांधकाम अर्धवट सोडून ठेकेदार 'पळाला'; दोन वर्षापासून काम रखडले, विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शाळा भाड्याच्या घरात

Sugarcane Farmers Protest Escalation : ऊस दरावरून पश्चिम महाराष्ट्र पेटला! कारखान्यांच्या दारात उभारणार छावण्या; 'या' दिवशी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा मोठा इशारा

Maharashtra Mega Recruitment : तरुणांसाठी मोठी लॉटरी! महसूल विभागात हजारो पदांवर होणार थेट भरती; पाहा दरमहा किती मिळणार मानधन?

SCROLL FOR NEXT