मुंबई

महापालिकेच्या कंदील स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

महापालिकेच्या कंदील स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पारितोषिक वितरण सोहळा, कलाकृतींचे प्रदर्शन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कांदिवली, ता. १ (बातमीदार) ः मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या कार्यानुभव विभागातर्फे आयोजित कंदील स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आणि विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन शुक्रवारी (ता. ३०) करी रोड येथील त्रिवेणी संगम महापालिका शालेय इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडले.
या स्पर्धेत महापालिकेच्या सर्व भाषिक शाळांसह एमपीएस, सीबीएसई आणि आयसीएसई शाळांमधील सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहावीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक पणत्या, सातवीच्या विद्यार्थ्यांनी कलात्मक कटवर्क रांगोळ्या, तर आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे आकाशकंदील तयार केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि कलाकौशल्यातून विविध आकर्षक कलाकृती साकारल्या.
शिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन किरतकुडवे, उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) मुख्तार शाह आणि संगीत कला अकादमीचे अधीक्षक लक्ष्मण गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यानुभव विभागाच्या निदेशिका तृप्ती पेडणेकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
या वेळी उपशिक्षणाधिकारी ममता राव, किशन केंकरे, आरती खैर आणि अधीक्षक छाया साळवे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांनी पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे यांनीही प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची पाहणी केली. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कलात्मकता आणि कल्पकतेला प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कनॉट प्लेसमधील दुकानं भाजपानं जबरदस्तीनं बंद केली; राहुल गांधींचा भाजपवर गंभीर आरोप; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची 'महारॅली'

मतांसाठी उमेदवारांची भन्नाट ऑफर! कुठे २,५०० रुपये, तर कुठे चक्क एक किलो चिकन फ्री; मतदानाच्या दिवशी लोकशाहीचे धिंडवडे!

Vadgaon Anand Bypass Theft News : पुणे-नाशिक महामार्गावर ६६ वर्षीय वृद्धाला बोलण्यात गुंतवून २ लाख ८९ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले; आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल, परिसरात खळबळ

Latest Marathi News Update : ऊस दराचा प्रश्न पेटला! शेतकरी संघटना आणि विठ्ठल कारखान्याचे समर्थकांकडून महामार्गावर रास्ता रोको

Spiritual Leadership: राजयोगी ब्रह्माकुमार दशरथभाई भागवत यांना राष्ट्रीय अध्यात्म नेतृत्व पुरस्काराने सन्मानित

SCROLL FOR NEXT