मुंबई

ठाण्याच्या बाजारपेठांमध्ये दिवाळीचा शॉपिंग फिव्हर!

CD

ठाणेकरांची दिवाळी खरेदीसाठी झुंबड
सजावटीच्या वस्तू, रोषणाईने बाजारपेठा उजळल्या


ठाणे, ता. १ (वंशिका चाचे) : दिवाळीचा सण जवळ आल्याने ठाण्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. शनिवार-रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत ठाणेकरांनी शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली आहे. कपडे, दागिने, आकाशकंदील, रांगोळी, आकर्षक पणत्या, गृहसजावटीच्या वस्तू आणि दिवाळी फराळाच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. बाजारपेठांमधील आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी सजावट आणि विविध वस्तूंचे स्टॉल यांमुळे परिसराला मिनी मॉलचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

ठाण्यातील प्रमुख खरेदी केंद्र असलेल्या गोखले रोडवर दिवाळीचा झगमगाट पाहायला मिळत आहे. नौपाडा व्यापारी मंडळाच्या वतीने आयोजित ‘नौपाडा शॉपिंग फेस्टिव्हल २०२६’मुळे या परिसराच्या आकर्षणात भर पडली आहे. रस्त्याच्या दुतर्फा केलेली रोषणाई, विविध कार्टून व्यक्तिरेखांची चलचित्रे आणि सेल्फी पॉइंट्स लहान मुलांसह मोठ्यांचेही लक्ष वेधून घेत आहेत. खरेदीबरोबरच मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी कुटुंबीयांची येथे गर्दी होत आहे.

जांभळी नाका परिसरात पूजा साहित्य, सुका मेवा, उटणे, साबण आणि फराळाच्या साहित्याच्या खरेदीसाठी सकाळपासूनच वर्दळ वाढली आहे. राम मारुती रोडवर ट्रेंडी कपडे आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी तरुणाईची पसंती दिसत आहे. तर स्टेशन रोडवरील स्टॉल्सवर कमी किमतीत आकर्षक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे.

सवलतींमुळे खरेदीला वेग

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने-चांदीचे दागिने आणि वाहन खरेदीवर विविध सवलती दिल्या जात आहेत. सोन्या-चांदीच्या घडणावळीवरही विशेष सूट उपलब्ध करून देण्याची तयारी व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे सणासुदीच्या खरेदीसोबत बचतीची संधी साधण्यासाठी ग्राहक बाजारपेठांकडे वळत आहेत. सुट्टीच्या दिवसांतील वाढती गर्दी आणि खरेदीचा उत्साह यामुळे ठाण्यातील बाजारपेठांमध्ये दिवाळीची खरी रंगत अनुभवायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

Drought Crisis: टंचाईच्या स्थितीतून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न ;शरद पवार यांचा दौरा सुरु

Latest Marathi News Update : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा तालुक्यात केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद

IND vs NZ ODI: टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया पुन्हा सज्ज! पहिला वनडे सामना कधी, कुठे अन् किती वाजता? लाईव्ह सामना टीव्ही मोबाईलवर कुठे पाहता येणार?

SCROLL FOR NEXT