मुंबई

कल्याणमध्ये ‘हिट अँड रन’चा थरार

CD

कल्याण, ता. १ (बातमीदार) : शहरात ‘हिट अँड रन’च्या दोन भीषण घटना उघडकीस आल्या आहेत. भरधाव वेगाने आलेल्या वाहनांनी पादचाऱ्यांना धडक देऊन गंभीर जखमी केले आणि अपघातानंतर दोन्ही वाहनांचे चालक जखमींना वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी कल्याणमधील खडकपाडा पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पसार चालकांचा शोध सुरू आहे.

पहिल्या घटनेत बुधवारी (ता. २८) सकाळच्या सुमारास खडकपाडा परिसरातील रमेश बाळा चव्हाण (वय ७५) हे आपल्या नातीला शाळेच्या बसमध्ये सोडल्यानंतर झुलेलाल चौकातून घराकडे परतत होते. यादरम्यान पाठीमागून आलेल्या एका कारने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात चव्हाण यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत दुर्गाडी गणेश घाट परिसरात शुक्रवारी (ता. ३०) रात्रीच्या सुमारास मुज्जमीत जफर खान (वय १८) हा मित्रांसोबत फिरत होता. गणेश घाटावरून ब्रिजकडे चालत जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव रिक्षाने त्याला जोरदार धडक दिली. रिक्षाचे चाक त्याच्या पायावरून गेल्याने त्याचा डावा पाय गंभीर जखमी झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

Pune Solapur Highway: कदमवाकवस्तीत सेवा रस्त्यालगत कचरा; अपघातांचे सत्र अन् साथीच्या आजारांचा धोका, नागरिक संतप्त

Latest Marathi News Update : नागपुरातील ८ सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी; प्रत्येकी १० लाखांच्या खंडणीची मागणी, अभिनेता टायगर श्रॉफच्या उदाहरणाचा धाक

Bachchu Kadu : दिवाळी मदतीवरून बच्चू कडूंचा महायुती सरकारला घरचा आहेर, शेतकर्‍यांना 10 हजारांची मदत देण्याची मागणी

INDA vs NZA, Test: कठीण प्रसंगी जुरेल चमकला! ठोकले दमदार शतक, आकाश दीपचीही फिफ्टी; पण न्यूझीलंडच्या बॉयलकडून चोख प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT