मुंबई, ता. १ : शास्त्रीय गायनासोबतच गझल गायिका म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ. सोमा घोष यांनी आपल्या गायनातून भारतीय संगीतपरंपरेत वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशातच शास्त्रीय संगीताची मैफल आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, असे चित्र मुंबईत पाहायला मिळाले. पद्मश्री डॉ. सोमा घोष यांच्या गायनाला शारदा ज्ञानपीठ इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या साथीने दाद दिली.
कार्यक्रमानंतर डॉ. घोष यांची स्वाक्षरी घेण्यासाठीही विद्यार्थ्यांनी गर्दी केली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सादरीकरणातून, ‘मधु मूर्छना’ आणि शारदा ज्ञानपीठ इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने ‘भारतीय संगीत परंपरा’ या चार शहरांतील शास्त्रीय संगीत मैफल मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील कार्यक्रमात डॉ. सोमा घोष यांच्यासह श्रद्धा पृथ्वीराज, संगीतकार विवेक प्रकाश आणि अन्य कलाकारांनी सादरीकरण केले. या कलाकारांनी डॉ. घोष यांच्या गायनाला साथ देण्याबरोबरच स्वतंत्र सादरीकरणही केले. या कार्यक्रमाला ‘भाजप’चे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह आणि अनिल मुरारका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख करून देणे आणि त्यांच्यात या संगीताविषयी रुची निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मुंबईनंतर कोलकता, वाराणसी आणि दिल्ली येथे या मैफलींचे आयोजन करण्यात येणार आहे.
मुंबई : शास्त्रीय संगीत मैफलीत सोमा घोष यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.